नाशिक

नाशिकरोडला गुन्हेगारांची हिंमत वाढली; थेट ‘बिटको’त घुसून कोयत्याने वार

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
जुन्या वादाची कुरापत काढून एका 21 वर्षीय तरुणावर आधी रोकडोबावाडी भागात आणि त्यानंतर तो उपचार घेत असताना थेट बिटको रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात घुसून कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना 8 एप्रिल रोजी घडली. या हल्ल्यात दीपक अनिल गांगुर्डे (वय 21) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक गांगुर्डे हा रोकडोबावाडी, देवळालीगाव येथे आपल्या मामेभावाकडे राहून मजुरी करतो. आरोपी दीपक चटोले याच्याशी वर्षापूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला. बुधवारी
सायंकाळी 5.30 च्या सुमारास दीपक रिक्षा पाहण्यासाठी थांबला असताना दीपक चटोले, सनी चटोले आणि संदीप चटोले यांनी त्याला गाठले. तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणत आरोपींनी घरातून कोयते आणून दीपकच्या डोक्यात गंभीर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपकला नातेवाइकांनी उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, आरोपींचा राग शांत झाला नव्हता. रात्री 9.30 च्या सुमारास जेव्हा दीपक बेडवर झोपलेला होता, तेव्हा संदीप चटोले हातात कोयता घेऊन थेट रुग्णालयात शिरला आणि त्याने दीपकच्या मानेखाली वार करून त्याला पुन्हा जखमी केले.
रुग्णालयात हल्ला होत असताना तेथे उपस्थित असलेले सफाई कामगार राम निवृत्ती शिंदे, सुरक्षारक्षक दीपक भोसले, मायकल निकाळजे आणि परिचारिका कावेरी नेहे यांनी अत्यंत धाडसाने हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. कर्मचार्‍यांनी आरडाओरड केल्याने आणि प्रतिकार केल्याने संशयित तेथून पसार झाले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार दीपक चटोले, सनी चटोले आणि संदीप चटोले यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक माळी आणि हवालदार गायकवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Criminals on Nashik Road have become bolder; they enter ‘Bitco’ and attack with a scythe

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 minute ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

9 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

14 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

20 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

26 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

40 minutes ago