नाशिक

कर्जाच्या नावाखाली महिलांची लाखो रुपयांची फसवणूक

सिडको : विशेष प्रतिनिधी
मायक्रो फायनान्स कंपनीच्या नावाखाली महिलांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार अंबड परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सई राजेंद्र बोडके, राजेंद्र बोडके आणि विनोद दौड अशी आरोपींची नावे असून, त्यांनी संगनमताने ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. याबाबत सिडको परिसरातील रहिवासी संगीता प्रशांत झिटे (वय 37) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘ओम साई बचत गट’ आणि ‘अरिहंत मायक्रो फायनान्स, चेन्नई’ यांच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्यांनी विविध बचत गट स्थापन करून महिलांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून वेळोवेळी ऑनलाइन व्यवहारांद्वारे 3 लाख 11 हजार रुपये तसेच रोख स्वरूपात 15 लाख 42 हजार रुपये, असा एकूण 18 लाख 53 हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. याशिवाय, सुमारे चार तोळे सोन्याचे दागिनेही घेतल्याचे तक्रारीत
नमूद आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही कर्ज मंजूर न करता आरोपींनी ही रक्कम व दागिने परत न देता फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात इतर अनेक महिलांचीही फसवणूक झाल्याची शक्यता असून, एकूण रक्कम 3 ते 4 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पैसे परत मागितल्यास फिर्यादीला धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. ही घटना 19 जून 2025 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान अंबड परिसरातील राणा प्रताप चौक व इतर ठिकाणी घडली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास
करत आहेत.

Women cheated of lakhs of rupees in the name of loan

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

57 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago