नाशिक

ऋषीपंचमीनिमित्त गोदास्नानास गर्दी

नाशिक : प्रतिनिधी
ऋषीपंचमीनिमित्ताने महिलांनी गोदाघाटावर सप्तऋषींचे प्रतीक म्हणून सात खड्यांचे पूजन केले. त्यासाठी महिला भाविकांची गोदाघाटावर पूजा व स्नानासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी महिलांनी पारंपरिक पद्धतीने सप्तऋषींचे पूजन केले. गोदाकाठावर सात खडे मांडून ऋषींविषयी कृतज्ञता म्हणून पूजन व उपवास करण्यात आला.
गणरायाच्या आगमनानंतर दुसर्‍या दिवशी ऋषीपंचमी असते. हरितालिकेप्रमाणेच ऋषीपंचमीचे व्रतही करण्यास महत्त्व आहे.
पंचांगानुसार ऋषीपंचमी दरवषीर्र् भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरी केली जाते. यावेळी ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यामुळे या दिवशी महिला भल्या पहाटे उठून नदीकिनारी सप्तऋषींची सुपारी किंवा नदीकिनारी सप्तऋषींची पूजा करतात. आघाड्याची पाने चावून गंगास्नान केले जाते.
या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. या दिवशी स्वकष्टाने केलेले अन्न ग्रहण केले जाते. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वकष्टाने अन्न खाल्लेे जावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
महिलांच्या मासिक पाळीत नकळत घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त म्हणूनही हेे व्रत साजरे केले जाते. असे म्हटले जाते की, हे व्रत केल्यामुळे महिलांंच्या सगळ्या दोषांचे निवारण होते. या दिवशी स्त्रिया, कुमारिका, तसेच पुरुषदेखील ऋषीपंचमीचा उपवास करतात. या दिवशी स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडांची मुळे, भाज्या यांपासून भाजी केली जाते आणि ती नैवेद्य म्हणून दाखवली जाते. त्याशिवाय म्हशीचे दूध, फळे याचे सेवन केले जाते. दुसर्‍या दिवशी उपवास सोडताना श्वानाचे तोंड पाहू नये, अशीही मान्यता आहे. त्यामुळे भल्या पहाटे ऋषीपंचमीचा उपवास सोडतात.

Crowds gather for a holy dip in the Godavari on the occasion of Rishi Panchami.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

5 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

5 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

6 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

6 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

6 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

6 hours ago