नाशिक

ईदच्या खरेदीसाठी मध्यरात्रीपर्यंत बाजारपेठांमध्ये गर्दी

जुना नाशिक : वार्ताहर
रमजान महिन्यातील बावीस उपवास पूर्ण झाल्याने ईदच्या खरेदीस वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर जुने नाशिक परिसरातील बाजारपेठा अक्षरशः ओसंडून वाहत आहेत. भद्रकाली, दूधबाजार, बागवानपुरा, फाळके रोड, मौलाबाबा चौक, फुले मार्केट, मुलतानपुरा, वडाळारोड आदी परिसरात रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
ईदच्या तयारीला सध्या वेग आला आहे. महिलांसाठी नवनवीन पद्धतीचे पंजाबी ड्रेसेस, शरारा, गरारा आणि डिझायनर साड्यांची मोठी दुकाने थाटली आहेत. पुरुषांसाठी पठाणी सूट, कुर्ता तसेच विविध प्रकारच्या टोप्यांनी बाजारपेठ सजली आहे. महिलांसाठी विविध प्रकारच्या बांगड्या, मेहंदी आणि दागिने उपलब्ध आहेत. तसेच सुगंधी अत्तरांचे स्टॉल्स ठिकठिकाणी लागले आहेत. याशिवाय, सुका मेवा, खजूर आणि शिरखुर्मासाठी लागणारी शेवयांची दुकानेही गजबजलेली दिसून येत आहेत. दरम्यान, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या वतीने सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आली आहे.

Crowds in markets till midnight for Eid shopping

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

5 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

5 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

5 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago