नाशिक

आडगाव ट्रक टर्मिनसचा मार्ग मोकळा

दिल्लीच्या मंदिपा ग्रुपकडून शंभर कोटींचा खर्च

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधील आडगाव येथे मुंबई-आग्रा महामार्गालगत महापालिकेच्या तीस एकर जागेवर 90 ते 100 कोटी खर्चाचा आधुनिक ट्रक टर्मिनल प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक महापालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेत दिल्लीच्या मंदिपा ग्रुपने यासाठी तयारी दर्शवली आहे.
महापालिकेने डिझाइन, डेव्हलप, फायनान्स, ऑपरेट अँड मेन्टेन या सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर आडगाव येथे ट्रक टर्मिनल उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार निविदाप्रक्रिया राबवली जात होती. सध्याच्या जागेवर 100 कोटी खर्चाचा अत्याधुनिक ट्रक टर्मिनस प्रकल्प उभारला जाणार आहे. तीस वर्षांच्या कराराने ट्रक टर्मिनस दिला जाणार आहे. ही संस्था महापालिकेला वर्षाला 90 लाखांचे भाडे देणार आहे. जुने टर्मिनस ओस पडल्यामुळे आता येथे नवीन सुविधांसह पुनर्विकास केला जात आहे. या परिसरातच 100 ई-बसेससाठी डेपो उभारण्याचे कामही वेगाने सुरू आहे. महापालिका आडगाव येथील जुन्या ट्रक टर्मिनसच्या जागी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज नवीन टर्मिनस उभारणार आहे. जकात बंद झाल्यामुळे जुने टर्मिनस बकाल झाले होते. त्यामुळे हा परिसर मद्यपी व जुगारींचा अड्डा बनण्याची भीती व्यक्त केली जात होती. आडगाव ट्रक टर्मिनसजवळच महापालिकेने एनकॅप अंतर्गत इलेक्ट्रिक बसेससाठी नवीन डेपो उभारला आहे. तेथे शंभर इलेक्ट्रिक बसेसची व्यवस्था होणार आहे. परिसरात टाटा मोटर्सचे व्यावसायिक वाहन डीलर आणि विविध ट्रान्स्पोर्ट सेवा उपलब्ध आहेत. कंटेनर आणि अवजड ट्रक पार्क करण्यासाठी हे एक प्रमुख ठिकाण म्हणून निश्चित करण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर नाशिकमधील अवजड वाहतुकीची कोंडी फोडण्यास आणि ट्रकसाठी सुरक्षित पार्किंग सुविधा उपलब्ध होणार आहे.
नाशिक महापालिकेने ट्रक टर्मिनससाठी प्रसिद्ध केलेल्या निविदेला अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे यासाठी तिसर्‍यांदा फेरनिविदा प्रसिद्ध करण्याची वेळ प्रशासनावर ओढावली होती. या ठिकाणी वाहनचालकांना डेव्हलपर माल लोड-अनलोडसाठी स्टोअरेज सुविधा, वे-ब्रिज, ट्रक वर्कशॉप, रिटेल आउटलेट्स, ट्रान्स्पोर्ट ऑफिसेस, शोरूम, मोटेल, हॉटेल्स आदी सुविधा मिळणार आहे.

वाहतूक कोंडी होणार कमी

ट्रक टर्मिनस प्रकल्प आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हाती घेतला आहे. ट्रक व कंटेनर पार्किंगसाठी चालकांना सुविधा उपलब्ध करून देणार असल्याने यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

ट्रक टर्मिनस प्रकल्पाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. तीनशे ट्रकची व्यवस्था होणार आहे. दोन वर्षांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
– करिष्मा नायर, अतिरिक्त आयुक्त, मनपा

Road to Adgaon Truck Terminus cleared

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago