पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षक प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण
सिन्नर : प्रतिनिधी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 नुसार इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम तब्बल 34 वर्षांनंतर बदलण्यात आला आहे. भारतातील हा पहिलाच एकात्मिक व समग्र दृष्टिकोन असलेला शैक्षणिक प्रकल्प आहे. या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिलीसाठी अध्यापन करणार्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
शहरातील संजीवनी प्राथमिक शाळा, सरदवाडी येथे हे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणामध्ये समग्र कार्ड कसे तयार करावे, क्षमतेवर आधारित अध्यापन कसे करावे, नवीन कृती आधारित उपक्रम, आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अभ्यासक्रम आराखड्याचे संकल्पनात्मक व प्रात्यक्षिक स्वरूप यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
गटविकासाधिकारी अशोक भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सनियंत्रक विस्ताराधिकारी विजय बागुल, कैलास सांगळे, विषयतज्ज्ञ संदीप गीते यांनी नियोजन केले. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून गोरक्ष सोनवणे, गणेश वामन, विजय खतोडे, नवनाथ सांगळे, राजेंद्र कोकाटे, शक्ती महाजन, सतीश बनसोडे, किरण धोक्रट आणि अरुण बेलदार यांनी काम पाहिले.
नैसर्गिक जिज्ञासेवर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब
नवीन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या नैसर्गिक जिज्ञासेवर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब होत आहे. हे प्रशिक्षण शिक्षकांना या बदलास तयार करत असून बालकेंद्रित शिक्षण पद्धती शाळांमध्ये प्रभावीपणे राबवता येणार आहे.
– गोरक्ष सोनवणे, तज्ज्ञ शिक्षक
कृतिशील शिक्षणाला महत्त्व
इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये मूलतत्त्व, भाषा विकास, अनुभवाधारित व कृतिशील शिक्षण या सर्व घटकांचा समावेश आहे. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना या नव्या दृष्टिकोनानुसार अध्यापन करता येईल. बदलत्या शिक्षणपद्धतींशी शिक्षक जुळवून घेऊन विद्यार्थ्यांना सक्षमपणे शिकवू शकतील.
– राजेश डामसे, गटशिक्षणाधिकारी, सिन्नर
पुरुषोत्तम नाईक मेष : अडचणी वाढतील या सप्ताहात बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची…
बालाजी सोशल फाउंडेशनतर्फे भव्य देखावा उभारणीला सुरुवात नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी दरवर्षी अप्रतिम देखाव्यांसाठी ओळखल्या…
मनमाडला अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात मनमाड : प्रतिनिधी भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग…
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय मेशी : वार्ताहर खडकतळे येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नववीतील विद्यार्थिनी…
मंत्री सामंतांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राची आज आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य…
दुपारपासूनच फेरीला सुरुवात; ब्रह्मगिरीवर भक्तांची गर्दी त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर येथे श्रावणाच्या तिसर्या सोमवारच्या ब्रह्मगिरी…