नाशिक

जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान

4,500 हेक्टरवरील उन्हाळी कांद्याला फटका

लासलगाव : समीर पठाण
गेल्या आठवड्यात गुरुवारी (दि. 19) नाशिक जिल्ह्याच्या काही भागांत झालेल्या अवकाळी मुसळधारेमुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांत 4,500 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेल्या उन्हाळी कांद्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांच्या अंदाजानुसार हे नुकसान 12 ते 15 टक्क्यांपर्यंत झाले आहे.
राज्य कृषी विभागाच्या प्राथमिक मूल्यांकनानुसार, सर्वाधिक नुकसान मालेगावमध्ये झाले असून, तेथे 1,646 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापाठोपाठ सटाणा येथे 1,598 हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. उर्वरित 950 हेक्टर पिकाचे नुकसान नांदगाव, निफाड आणि सिन्नर तालुक्यांमध्ये झाल्याचे वृत्त आहे. यंदा नाशिकमध्ये उन्हाळी कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात आधीच घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या 1.8 लाख हेक्टरवरून हे क्षेत्र सुमारे 10 टक्क्यांनी घटून 1.6 लाख हेक्टरवर आले आहे.
अधिकार्‍यांनी सांगितले की, अचानक झालेल्या पावसामुळे सुमारे 4,500 हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याने, या हंगामात उन्हाळी कांद्याचे उत्पादन 12% ते 15% ने घटू शकते. उत्पादन गेल्या वर्षीच्या 39 लाख मेट्रिक टनांवरून यावर्षी सुमारे 34 लाख टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी मुसळधारेसह झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यात सुमारे 7,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. उन्हाळी कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले. डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून, 1,377 हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहे, ज्यामध्ये एकट्या मालेगावमधील 1,264 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
दरम्यान, गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याच्या आवकेत हळूहळू वाढ होत आहे.सध्या बाजारात उशिरा येणार्‍या लाल खरीप कांद्याचेच वर्चस्व असून, आवकेत त्याचा वाटा जवळपास 80 टक्के आहे. बुधवारी (दि.18) आशिया खंडातील सर्वांत मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला कमीत कमी 300, जास्तीत जास्त 1080 रुपये, तर सरासरी 900 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. नवीन उन्हाळ कांद्यास कमीत कमी 601, जास्तीत जास्त 1401, तर सरासरी 1225 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला.

 

Damage caused by unseasonal rains in the district

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago