स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्पोर्टवोटवर
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल खेळ आणि क्रीडाशौकिनांच्या गळ्यातील ताईत असलेल्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा (शिवचषक) बिगुल वाजला आहे.
येत्या 2 ते 6 एप्रिल 2026 या कालावधीत सिन्नर येथील नमो क्रीडानगरी (आडवा पट्टा) येथे ही 73 वी पुरुष व महिला गट स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि सह्याद्री युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे सलग तिसर्या वर्षी जागतिक स्तरावर एक्सक्लुझिव्ह थेट प्रक्षेपण करण्याचे हक्क स्पोर्टवोट या डिजिटल प्लॅटफॉर्मने पटकावले आहेत. यामुळे जगभरातील कबड्डीप्रेमींना घरबसल्या या हाय-व्होल्टेज
स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे.
यावेळच्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रो-कबड्डी लीगमध्ये आपल्या खेळाची छाप पाडणार्या दिग्गज खेळाडूंची मांदियाळी. नाशिकचा आकाश शिंदे (बेंगळुरू बुल्स), पुण्याचे अजित चव्हाण (यू मुंबा) व तेजस पाटील (हरियाणा स्टीलर्स), अहिल्यानगरचा आदित्य शिंदे (पुणेरी पलटण) आणि कोल्हापूरचा दादासो पुजारी (पुणेरी पलटण) यांसारखे स्टार खेळाडू आपापल्या जिल्हा संघांचे प्रतिनिधित्व करताना दिसतील.
स्पोर्टवोटचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धांत अगरवाल यांनी या भागीदारीबद्दल बोलताना सांगितले, ‘ राज्य कबड्डी असोसिएशनच्या प्रवक्त्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करताना नमूद केले की, गेल्या तीन वर्षांपासून स्पोर्टवोटसोबत असलेल्या या प्रवासामुळे कबड्डी खेळाचा प्रसार तळागाळातील चाहत्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत झाली आहे. पाच दिवस चालणार्या या स्पर्धेत प्रो-खेळाडू आणि जिद्दीने खेळणारे नवोदित खेळाडू यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळेल. हे सर्व सामने स्पोर्टवोट अॅपवर थेट पाहता येतील.
The thrill of the state championship kabaddi will be played in Nashik.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…