नाशिक

नाशिकमध्ये रंगणार दराडे विरुद्ध गिते सामना

मंत्री गिरीश महाजन, सामंत यांची शिष्टाई निष्फळ

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक विधान परिषद निवडणुकीचे चित्र काल (गुरुवारी) माघारीनंतर अखेर स्पष्ट झाले. मंत्री गिरीश महाजन, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी शिष्टाई करूनही अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांची माघार न झाल्याने आता नरेंद्र दराडे यांचे बिनविरोध निवडीचे मनसुबे उधळले गेले. रिंगणात तीन उमेदवार उरले असले, तरी खरी लढत दराडे विरुद्ध गिते अशीच होणार आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून दोन दिवसांपासून नाशिकमध्ये हालचाली गतिमान झाल्या होत्या. मंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये येऊन मनधरणीचे प्रयत्न केले. काल माघारीच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपाकडून अर्ज भरलेल्या गणेश गिते यांची माघारी घेण्यात यश आले. तथापि, त्यांचे बंधू गोकुळ गिते यांची माघार न झाल्याने महाजन यांची शिष्टाई निष्फळ ठरली.
निवडणूक बिनविरोध पार पडावी यासाठी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात आले. यात भाजपाचे बंडखोर गणेश गिते यांनी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गोरख बोडके, विष्णू म्हैसधुणे, अपक्ष कुणाल दराडे, परवेझ कोकणी, इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्राचे मोहम्मद खालील अब्दुल रशिद, अपक्ष गणेश गिते यांनी माघार घेतली. गोकुळ गिते आणि नरेंद्र दराडे, प्रसाद हिरे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक तिरंगी होणार असली तरी खरा सामना नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गिते असाच रंगणार आहे. गोकुळ गिते यांना महाविकास आघाडीकडून पाठिंबा मिळणार, अशी चर्चा रंगताना दिसत आहे. त्यामुळे महायुतीसाठी नाशिक विधान परिषद निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची झाल्याचे चित्र आहे.
गोकुळ गिते यांच्या उमेदवारीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. अनेक नगरसेवक व मतदारांचा गिते यांना छुपा पाठिंबा मिळण्याची शक्यता असल्याने दराडे यांच्यापुढे कडवे आव्हान निर्माण झाले आहे.

भाजपाची मते गितेंकडे वळणार?

शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी यंदाची विधान परिषद निवडणूक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. गोकुळ गिते यांना महाविकास आघाडी पाठिंबा देण्याची चर्चा रंगली असताना दुसरीकडे, गोकुळ गिते हे भाजपाचे गणेश गिते यांचे भाऊ आहेत. परिणामी गोकुळ गिते यांना भाजपाची पहिल्या पसंतीची मते मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

घोडेबाजार तेजीत

विधान परिषद निवडणुकीसाठी 619 मतदार आहेत. पसंती क्रमांकानुसार निवडणूक होणार असल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Darade vs Geete match to be held in Nashik

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago