इगतपुरीत 4,300 शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
घोटी : प्रतिनिधी
एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले असताना, दुसरीकडे इगतपुरी तालुक्यातील 4 हजार 300 शिधापत्रिका एनपीएच (प्राधान्येतर कुटुंब) प्रवर्गात वर्ग झाल्याने अनेक गरीब कुटुंबांचे स्वस्त धान्य बंद झाले आहे. यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी कुटुंबांचाही समावेश असून, त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत, पात्र लाभार्थ्यांचे धान्य लवकरात लवकर सुरू न केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव यांनी दिला आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांच्या पात्रतेची पडताळणी केली जात असून, उत्पन्न व अन्य निकषांच्या आधारे वर्गीकरण केले जात आहे. मात्र, या प्रक्रियेत प्रत्यक्ष गरीब व गरजू कुटुंबांचेही धान्य बंद झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. इगतपुरी हा आदिवासीबहुल तालुका असून, येथील नागरिक शेती, शेतमजुरीवर अवलंबून आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नाचे साधन आटले असताना स्वस्त धान्याचा आधारही हिरावल्याने कुटुंबांची चिंता
वाढली आहे.
धान्य बंद झाल्याची कारणे जाणून घेण्यासाठी नागरिकांना सेतू कार्यालये आणि पुरवठा विभागाच्या फेर्या माराव्या लागत आहेत. प्रशासनाने उत्पन्नाचे व पात्रतेचे निकष सार्वजनिक करून संभ्रम दूर करावा आणि पात्र लाभार्थ्यांचे धान्य तातडीने पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी
होत आहे.
इगतपुरी तालुक्यातील हजारो शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद झाल्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. दुष्काळामुळे जनता आधीच आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीत गरिबांच्या ताटातील धान्य बंद होणे अन्यायकारक आहे. प्रशासनाने तातडीने
फेरतपासणी करून धान्य सुरू करावे, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल.
– निवृत्ती जाधव, जिल्हाप्रमुखशिधापत्रिकेवर मिळणारे स्वस्त धान्य हा आमच्यासारख्या गरीब कुटुंबांसाठी मोठा आधार आहे. दुष्काळामुळे अडचणी वाढल्या असताना धान्य बंद झाल्याने घरखर्च कसा चालवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने आमची परिस्थिती समजून घेऊन धान्य पुन्हा सुरू करावे.
– काळूबाई झोले, लाभार्थी
In times of famine, the morsel was snatched from the plates of the poor!
- वाहिद बागवान ब्रह्मगिरीच्या कुशीतून पाझरणारी गोदावरी, द्राक्षबागांतून आणि सह्याद्रीच्या दर्याखोर्यांतून वाहणारा मंद, शीतल वारा…
- डॉ. किशोर पवार आपल्या भूतलावर 70% भूप्रदेश सागर, महासागर यांनी व्यापलेला आहे. महासागर म्हणजे…
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत सध्या प्रतिदिन वर्तमानपत्रांत बातम्या वाचायला मिळत आहेत. जगातील सर्वांत प्रदूषित शहरांच्या सूचीत…
काश्मीरचे दोन भाग आहेत. एक पाकिस्तानात, तर दुसरा भारतात आहे. पाकिस्तानातील काश्मिरी समाधानी नाहीत. त्यांना…
शिवाजीनगरमधील घटना; दोन संशयित ताब्यात पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी शिवाजीनगर परिसरात बंद घराचे कुलूप व…
भाविकांत संताप; दानपेटीतील रोकड अन् सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास येवला : प्रतिनिधी शहरातील पारेगाव रोड परिसरातील…