नाशिक

पिंपळगावमध्ये बंद घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

शिवाजीनगरमधील घटना; दोन संशयित ताब्यात

पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी
शिवाजीनगर परिसरात बंद घराचे कुलूप व खिडकी तोडून चोरट्यांनी 1 लाख 50 हजार 800 रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना 26 ऑक्टोबरला उघडकीस आली. शेजार्‍यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांना तातडीने माहिती मिळाल्याने दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
विनोद रामराव देशमाने यांचे कुटुंब बाहेरगावी असताना चोरट्यांनी त्यांच्या दोन मजली बंगल्याला लक्ष्य केले. घरातील कपाटे फोडून रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने असा 1,50,800 रुपयांचा ऐवज चोरण्यात आला. देशमाने यांच्या घरातून संशयास्पद हालचाली आणि देवघराची जाड काच फुटल्याचा आवाज आल्याने शेजार्‍यांना शंका आली. त्यांनी तातडीने प्रसंगावधान राखत पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भारत सुरेश मोगल व रोशन ऊर्फ राजेंद्र भास्कर मोरे या दोन संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या भारत मोगल याची राजकीय पार्श्वभूमी असल्याची आणि स्थानिक नगरपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याची चर्चा परिसरात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव बसवंत पोलीस करत असून, नागरिकांनी घराबाहेर जाताना सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

House broken into in Pimpalgaon; valuables worth 1.5 lakh rupees stolen

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नाशिकचा श्वास, व्यवस्थेचा फास!

- वाहिद बागवान ब्रह्मगिरीच्या कुशीतून पाझरणारी गोदावरी, द्राक्षबागांतून आणि सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांतून वाहणारा मंद, शीतल वारा…

9 minutes ago

समुद्राच्या पाण्यातून लिथियम

- डॉ. किशोर पवार आपल्या भूतलावर 70% भूप्रदेश सागर, महासागर यांनी व्यापलेला आहे. महासागर म्हणजे…

16 minutes ago

जीवघेणे प्रदूषण आणि वाढती वाहनसंख्या

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत सध्या प्रतिदिन वर्तमानपत्रांत बातम्या वाचायला मिळत आहेत. जगातील सर्वांत प्रदूषित शहरांच्या सूचीत…

22 minutes ago

पाकिस्तानधार्जिणे

काश्मीरचे दोन भाग आहेत. एक पाकिस्तानात, तर दुसरा भारतात आहे. पाकिस्तानातील काश्मिरी समाधानी नाहीत. त्यांना…

26 minutes ago

येवल्यात स्वामी समर्थ केंद्रात चोरट्यांचा डल्ला

भाविकांत संताप; दानपेटीतील रोकड अन् सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास येवला : प्रतिनिधी शहरातील पारेगाव रोड परिसरातील…

1 hour ago

दुष्काळात गरिबांच्या ताटातील घास हिरावला!

इगतपुरीत 4,300 शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा घोटी : प्रतिनिधी एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी आणि…

1 hour ago