नाशिक

येवल्यात स्वामी समर्थ केंद्रात चोरट्यांचा डल्ला

भाविकांत संताप; दानपेटीतील रोकड अन् सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास

येवला : प्रतिनिधी
शहरातील पारेगाव रोड परिसरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारत दानपेटीतील रोकड आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेल्याची घटना घडली आहे. देवाच्या मंदिरातच चोरी झाल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, शहरात सातत्याने होणार्‍या चोर्‍यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत केंद्रात प्रवेश केला. त्यानंतर दानपेटी फोडून त्यातील अंदाजे 50 हजार रुपयांची रोकड लांबवली. विशेष म्हणजे, पोलिसांना तपासात पुरावा मिळू नये म्हणून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा डीव्हीआरदेखील आपल्यासोबत नेला आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. येवला शहर व उपनगरांमध्ये सध्या चोर्‍यांचे सत्र वाढले असून, चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी आणि लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त करून त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिक व भाविकांकडून होत आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Thieves strike at Swami Samarth Kendra in Yeola

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नाशिकचा श्वास, व्यवस्थेचा फास!

- वाहिद बागवान ब्रह्मगिरीच्या कुशीतून पाझरणारी गोदावरी, द्राक्षबागांतून आणि सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांतून वाहणारा मंद, शीतल वारा…

9 minutes ago

समुद्राच्या पाण्यातून लिथियम

- डॉ. किशोर पवार आपल्या भूतलावर 70% भूप्रदेश सागर, महासागर यांनी व्यापलेला आहे. महासागर म्हणजे…

16 minutes ago

जीवघेणे प्रदूषण आणि वाढती वाहनसंख्या

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत सध्या प्रतिदिन वर्तमानपत्रांत बातम्या वाचायला मिळत आहेत. जगातील सर्वांत प्रदूषित शहरांच्या सूचीत…

21 minutes ago

पाकिस्तानधार्जिणे

काश्मीरचे दोन भाग आहेत. एक पाकिस्तानात, तर दुसरा भारतात आहे. पाकिस्तानातील काश्मिरी समाधानी नाहीत. त्यांना…

26 minutes ago

पिंपळगावमध्ये बंद घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास

शिवाजीनगरमधील घटना; दोन संशयित ताब्यात पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी शिवाजीनगर परिसरात बंद घराचे कुलूप व…

59 minutes ago

दुष्काळात गरिबांच्या ताटातील घास हिरावला!

इगतपुरीत 4,300 शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा घोटी : प्रतिनिधी एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी आणि…

1 hour ago