उत्तर महाराष्ट्र

रस्त्यातच प्रसूती झाल्याने बाळाचा मृत्यू

सटाणा प्रतिनिधी

– अल्पवयीन मुलीच्या अवैध गर्भपात प्रकरणी आधीच चर्चेत असलेल्या सटाणा ग्रामिण रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ व अपुऱ्या सुविधा अभावी  आदिवासी गरोदर महिलेची रस्त्यात प्रसूती झाल्याने बालकाचा मृत्यू झाला, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून  दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे,

तालुक्यातील नवी शेमळी येथील गरोदर महिला सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी मंगळवार दिनांक १३ रोजी दुपारी दोन वाजेता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.रुग्णालय प्रशासना कडून उपचारसाठी टाळाटाळ करण्यात आली व तिला उपचारासाठी दुसरीकडे बाहेर पाठवण्यात आले.
या दरम्यान उपचाराभावी नवजात अर्भकाच्या मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रात्री उशिरा रुग्णालयाला टाळे ठोकत दोषींवर कारवाई करण्याची मागणी करीत संताप व्यक्त केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे गरोदर माता तपासणी शिबीर सुरू असतांना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मनिषा समाधान सोनवणे ही गरोदर महिला उपचारासाठी आली असता.रुग्णालय प्रशासनाकडुन टाळाटाळ करण्यात आली.तिला दुसरीकड़े उपचारासाठी बाहेर पाठवण्यात आले. मात्र रस्त्यात तिची प्रसूती झाली. नवजात बालकासह त्याला पुन्हा रुग्णालयात आणण्यात आले.मात्र उपचार व सुविधा अभावी या बालकाचा मृत्यू झाला.त्यामुळे नागरिकांत सांताप झाला होता.या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

यावेळी माजी आमदार संजय चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज सोनवणे,भाजपचे अनिल पाकळे, शिवसेनेचे संदीप सोनवणे,चंद्रकांत सोनवणे,निखिल खैरनार,बबलू खैरनार,सूरज खैरनार ,सोनू सोनवणे आदी सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago