शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाई आणि शेतीच्या संकटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक व खासदार शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, कोणत्याही औपचारिक निकषांची वाट न पाहता राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची प्रमुख मागणी केली आहे. शेतकर्यांना मदतीसाठी 9 प्रमुख मागण्या पवारांनी पत्रातून केल्या आहेत.
यंदा राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर आणि उडीद यांसारखी खरिपाची उभी पिके करपून गेली आहेत. पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भावही वाढला आहे. केवळ शेतीचेच नव्हे, तर आगामी काळात ग्रामीण भागात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्याचा भीषण प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर वळणावर पोहोचली असल्याचे पवारांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या संकटाचा सामना करण्यासाठी पवारांनी काही तातडीच्या आर्थिक उपाययोजनांवर भर दिला आहे. शेतमजुरांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची विशेष मदत द्यावी, कर्जमाफी योजनेची तत्काळ अंमलबजावणी करून शेतकर्यांना नवे पीककर्ज उपलब्ध करून द्यावे आणि नियमित कर्जफेड करणार्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान 50 हजारांवरून 1 लाखापर्यंत वाढवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय, पीकविम्याचे वगळलेले निकष पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून गेल्या वर्षीची 17 हजारांची मदतही त्वरित वितरित करण्याची गरज त्यांनी पत्रात नमूद केली आहे.
Declare a drought in the state immediately.
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…