नाशिक

येवला तालुक्यात अन्न-पाण्यासाठी हरणांची वणवण

वनविभागाने लक्ष देण्याची गरज, पाणवटे निर्माण करण्याची गरज

येवला : प्रतिनिधी
उन्हाळ्याचे दिवस असल्याने वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. येवला तालुक्यातील पूर्व भागातील राजापूर, ममदापूर, खिर्डीसाठे, तसेच अन्य ठिकाणी हरणांचे कळप मोठ्या प्रमाणावर आहेत, परंतु या ठिकाणी पुरेशा प्रमाणात अन्न आणि पाणी साठा उपलब्ध नसल्याने हरणांना अन्न आणि पाण्याच्या शोधासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
परिणामी हरणांना पिण्याच्या पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे. अशाच परिस्थितीत कुत्र्यांच्या हल्ल्यात अथवा वाहनांचा धडकेत अनेक हरणांना आपला जीव गमवावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीतदेखील अनेक हरणं दगावली आहेत.
मागील आठवड्यात अन्न आणि पाण्याच्या शोधात असलेल्या दोन हरणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सातत्याने हरणांचा पिण्याच्या पाण्यासाठी जीव जात असेल तर वन विभाग प्रशासन करते काय? असा सवाल या परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात हरणांना अन्न आणि पाणी यांचा शोध घेत असताना आपला जीव गमविण्याची वेळ येते, ही बाब फार गंभीर आहे. शासनाने वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची निर्मिती केली. परंतु, वन विभाग मात्र वन्यप्राण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर, तसेच पूर्व भागात हरणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या ठिकाणी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तसेच वन विभागाच्या वतीने पाणवटे बांधण्यात आले आहे. या पाणवट्यात हरणांना पिण्यासाठी पाणी नसल्याने तसेच त्यांना अन्न मिळत नसल्याने हरणांना इतरत्र मानवी वस्तीकडे धाव घेऊन अन्न आणि पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे. ही परिस्थिती निर्माण झाली आहे.तालुक्यातील ममदापूर, राजापूर, खिर्डीसाठे तसेच पूर्व भागातील हरणांचे कळप असलेल्या ठिकाणी वन विभागाने हरणांसाठी मुबलक पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे तसेच त्यांना लागणारे अन्नदेखील उपलब्ध करून दिले पाहिजे. या ठिकाणी वन विभागाने अधिक प्रमाणात पाणवटे उभारण्याची गरज निर्माण झाली असून, अन्नदेखील उपलब्ध करून दिले पाहिजे. या ठिकाणी परिसरात हरणांसाठी पाणवटे, अन्न उपलब्ध करून दिल्यास हरणं अन्न आणि पाण्याच्या शोधासाठी मानवी वस्तीकडे फिरकणार नाहीत आणि त्यांच्या जिवाला धोका निर्माण होणार नाही. वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी वनविभागाने दक्ष असणे आवश्यक आहे.

Deer hunting for food and water in Yeola taluka

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

9 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

9 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

9 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

10 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

10 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

10 hours ago