लैंगिक शोषण प्रकरणातून उलगडताहेत आर्थिक व्यवहार
सिन्नर : प्रतिनिधी
महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेला भोंदू ‘कॅप्टन’ उर्फ अशोककुमार खरात याच्या कथित भोंदूगिरीच्या जाळ्याबरोबरच त्याने उभारलेल्या कोट्यवधींच्या मालमत्ता साम्राज्याचे धागेदोरेही समोर येऊ लागले आहेत. सिन्नर शहर तसेच ईशान्येश्वर देवस्थान असलेल्या मिरगाव परिसरात खरात आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे मोठ्या प्रमाणात जमीन असल्याचे महसुली कागदपत्रांतून स्पष्ट झाले आहे. लैंगिक शोषणाच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आर्थिक व्यवहारांवरही लक्ष केंद्रित झाल्याने बेनामी संपत्तीचा संशय व्यक्त केला जात असून, या व्यवहारांची चौकशी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिन्नर शहरात कॅप्टन अशोककुमार खरात याच्या नावे गट नंबर 247/3/2 मध्ये 80 गुंठे बिनशेती प्लॉट असल्याची नोंद आहे.
पत्नी कल्पना अशोककुमार खरात यांच्या नावे गट नंबर 247/3/1/2 मध्ये 28.55 आर बिनशेती प्लॉट आहे. तसेच गट नंबर 253/13 मधील प्लॉट क्रमांक 1 मध्ये 16.68 आर, तर गट नंबर 258/3/259/2/260/1 मध्ये एकूण 65 आर बिनशेती प्लॉट असल्याचे महसुली कागदपत्रांत नमूद आहे.
याशिवाय, सिन्नर शहरातच गट नंबर 806 मध्ये कल्पना खरात यांच्या नावे 12 गुंठे, तर गट नंबर 935/1/1 मध्ये 40 आर शेती असल्याचेही नोंदीत दिसते.
मिरगावातही जमिनींचा मोठा पसारा
मिरगाव येथे गट नंबर 309 मध्ये पत्नी कल्पना खरात यांच्या नावे 75 आर, तर स्वतःच्या नावे 74 आर जमीन आहे. गट नंबर 318/1 मध्ये स्वतःच्या नावे 1 हेक्टर 32 आर जमीन, तर गट नंबर 330 मध्ये स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे प्रत्येकी 1 हेक्टर 37 आर जमीन असल्याचे नोंदीत दिसते. याशिवाय, गट नंबर 447 मध्ये स्वतःच्या नावे 1 हेक्टर 32 आर जमीन आहे. पत्नीच्या नावे गट नंबर 315 मध्ये 0.97 आर, गट नंबर 318/4 मध्ये 1 हेक्टर 32 आर, तर गट नंबर 318/5 मध्ये 1 हेक्टर 13 आर शेती असल्याचे आढळते. तसेच आईच्या नावे मिरगावातील दोन गटांमध्ये अनुक्रमे 1 हेक्टर 80 आर आणि 0.72 आर शेती असल्याची नोंद आहे.
सामाईक शेतीतही हिस्सेदारी
कल्पना खरात यांच्यासह आणखी चार भागीदारांच्या नावे गट नंबर 163/4 मध्ये मिळून सुमारे दोन हेक्टर सामाईक शेती असल्याची नोंद आहे. त्यामुळे या व्यवहारातील इतर सहहिस्सेदारही तपासाच्या कक्षेत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बहुतेक बिनशेती प्लॉट मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून खरेदी केल्याचे दिसत असून, हे व्यवहार नियमित पद्धतीने झाले की दबाव, धाकदपटशाही किंवा भोंदूगिरीच्या प्रभावातून जमीन हस्तगत करण्यात आली, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.
कुटुंबीयांच्या नावेही मोठ्या जमिनी
महसुली नोंदींनुसार कॅप्टन खरात याने त्याच्या आईच्या नावे 68 गुंठे बिनशेती प्लॉट घेतल्याची नोंद आहे. याशिवाय, सख्ख्या भावाच्या नावे 64 गुंठे, तर सावत्र भावाच्या नावे 61 गुंठे शेती असल्याचेही समोर आले आहे. स्वतःच्या नावेही 80 गुंठे बिनशेती जमीन असल्याचे 7/12 उतार्यांवरून स्पष्ट होते.
‘शिवनिका संस्थान’च्या नावावर केवळ 15 गुंठे
मिरगाव येथील गट नंबर 318/5 मध्ये शिवनिका संस्थानच्या नावे अवघे 15 गुंठे क्षेत्र असल्याचे महसुली नोंदीत नमूद आहे. मात्र, या संस्थानचा मालकही अशोककुमार खरात असल्याचे पुढे आले आहे. मंदिरासह संस्थानचा प्रत्यक्ष जागेवरील पसारा पाहता जाम नदीच्या पात्रात अतिक्रमण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या देवस्थानासमोर जिल्हा परिषद निधीतून पाण्याचा जलकुंभ उभारण्यात आला असून, त्यासाठी दोन गुंठे जागा ग्रामपंचायतीच्या नावे करण्यात आल्याचे दिसून येते.
Crores of money earned through hypocrisy!
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…