मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव शहरातील गुलशनाबाद भागात गुरुवारी (दि. १२) सायंकाळी पाचच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांच्यासह विशेष पथक, आझादनगर पोलीस व वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून हरणाचे पंधरा किलो मांस, सुरा, चाकू जप्त केले. या प्रकरणी वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन व संरक्षित प्राण्याची शिकार केल्याच्या संशयावरून शरजील अंजूम अहमद (वय ३०, रा. मेन रोड, गुलशनाबाद) याला अटक करण्यात आली आहे. शहरात अवैध शिकार करून हरणाचे मांस आणल्याची माहिती श्री. संधू यांना मिळाल्याने खातरजमा होताच श्री. संधू, आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली महाजन, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावीद खाटिक, वन परिमंडळ अधिकारी अतुल देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक, आझादनगर पोलीस आदींनी संयुक्तरीत्या शरजील अंजूम यांच्या घराजवळ छापा टाकला असता हरणाचे मांस मिळून आले. डॉ. खाटिक यांनी घटनास्थळी मांस जप्त केल्यानंतर मांस व अन्य वस्तूंची तपासणी केली. यावेळी हरणाचे मुंडके, कान व कातडीसह तसेच चारही पाय व खुरे मिळून आले. त्यावरुन चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करून हे मांस असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मांस आणणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्री. संधू यांनी दिला आहे. रात्री उशिरा शरजील अंजूमविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
*छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन* नाशिक: प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री…
कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस…
नाशिक: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री…
अंमली पदार्थ विकणार्यांशी कनेक्शन उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस…
मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…
गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…