नाशिक

थंडी वाढल्याने सुकामेव्याच्या मागणीत वाढ

किराणा दुकानांत गर्दी; लासलगावकर घेताहेत गुलाबी थंडीचा अनुभव

लासलगाव : वार्ताहर
गेल्या दोन-तीन दिवसांपासून लासलगावसह परिसरात पुन्हा थंडीचा जोर अधिक वाढला असून, रात्री व पहाटेच्या वेळी चांगलीच थंडी पडत असल्यामुळे लासलगावकर या गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहेत.
या थंडीत आरोग्यास फायदा व्हावा, यासाठी सुकामेवा अर्थात ड्रायफ्रूटला प्रचंड मागणी वाढल्याचे येथील ड्रायफ्रूट विक्रेत्यांनी सांगितले आहे.सुकामेवा घेण्यासाठी लासलगाव येथील ड्रायफ्रूट विक्रेत्यांकडे तसेच किराणा दुकानांत ग्राहकांची गर्दी वाढली आहे. सुकामेवामध्ये काजू आणि बदाम यांच्या भावात जास्त अधिक फरक आहे. म्हशीच्या तुपापेक्षा गायीचे तूप आरोग्यासाठी उत्तम असल्याने त्यासाठी मागणी
वाढली आहे. थंडीत पोषक आहार तयार करताना सुकामेव्याच्या लाडूला अधिक पसंती आहे. त्यामुळे लाडूसाठी साहित्य घेण्याकडेही नागरिकांचा कल दिसून येतो
आहे.
रोजचे जेवण हे फक्त एक पोट भरण्यासाठी मदत करते; परंतु थंडीमध्ये वाढत्या भुकेमुळे ड्रायफ्रूट्स हे शरीरास परिपूर्ण ठरत असतात. यात सर्वच स्तरामधून चांगल्या प्रमाणात मागणी होते आहे. थंडीच्या दिवसांत भूक अधिक वाढत असल्यामुळे सुकामेवा हे उत्तम प्रकारचे औषध आहे जे प्रत्येकाने घ्यायलाच हवे, जेणेकरून शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती टिकून राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

थंडीची चाहूल लागल्यामुळे ग्राहक सुकामेव्याच्या खरेदीला पसंती देत आहेत. यात खारीक, खोबरे, काजू, बदाम, मनुका यांना मोठी मागणी आहे. सुकामेवामध्ये काजू आणि बदामच्या भावात जास्त फरक आहे. काही दिवसांत थंडी वाढणार असल्याने सुकामेव्याच्या मागणीत वाढ झाली आहे.
-ड्रायफ्रूट विक्रेता, लासलगाव

सुकामेव्याचे भाव (सुकामेवा दर प्रतिकिलो)

बदाम 760 ते 800,

काजू 880 ते 900,

खारीक 320 ते 350,

पिस्ता 1200,

जर्दाळू 1000 ते 1200,

अक्रोड 1000 ते 1400,

अंजीर 1200 ते 1350,

खोबरे 180 ते 200,

गूळ 50,

किसमिस 320 ते 350,

डिंक 280 ते 300,

गोडंबी 700,

तूप 450 ते 500 रु. प्रतिकिलो.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावली

सिडको : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची…

4 minutes ago

मालेगावात प्रतिबंधित औषधांचा साठा जप्त

तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…

11 minutes ago

तरुणाचा आयफोनचा हट्ट; संभाजीनगरात संपले कुटुंब!

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…

17 minutes ago

राज्यातील पोलीस ठाण्यांच्या रचनेत मोठे बदल

सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…

27 minutes ago

‘पॅलेट गन’प्रकरणी गुन्हा दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…

39 minutes ago

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

21 hours ago