नाशिक

गंगापूर रोड परिसरात चोरी, गुंडगिरी व अमली पदार्थांच्या वाढत्या घटनांवर अंकुशाची मागणी

प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेवक व नागरिकांचे गंगापूर पोलिसांना निवेदन

सातपूर : प्रतिनिधी
गंगापूर रोड परिसरातील आनंदवल्ली गाव, गंगापूर गाव, मळे विभाग, बेंडकुळेनगर, नवश्या गणपती परिसर, सावरकरनगर, वनविहार कॉलनी, संत कबीरनगर, काळेनगर, रामेश्वरनगर, बळवंतनगर, सिरीन मिडोज, गणेशनगर आणि सद्गुरूनगर या भागांमध्ये चोरी, उघड्यावर मद्यपान, गुंडगिरी तसेच अमली पदार्थांचे सेवन आणि विक्रीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप करत प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेवक व नागरिकांनी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांना निवेदन सादर केले.
नगरसेविका उषाताई बेंडकोळी, अंकिता शिंदे आणि कविता लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत विविध समस्या मांडल्या. रात्रीच्या वेळी अनेक भागांत पोलीस गस्त अपुरी असल्याने चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मारामार्‍या, दहशत निर्माण करणे आणि समाजकंटकांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, गंगापूर रोड हा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि उच्चभ्रू वस्तीचा परिसर असून, येथे मोठ्या प्रमाणावर मॉल्स, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापना आहेत. अनेक आस्थापनांकडे स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनचालक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे विशेषतः सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी वाढून अपघातांचा धोका निर्माण होत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली. परिसरातील काही हॉटेल्समध्ये रात्री 11 नंतरही मोठ्या आवाजात डीजे सुरू ठेवले जात असल्याने ध्वनिप्रदूषण वाढत असून, नागरिकांची शांतता भंग होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन चोरी, गुंडगिरी, अमली पदार्थांवरील कारवाई, नियमित रात्रीची गस्त, वाहतूक व्यवस्थापन आणि ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक व नागरिकांनी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी निवेदनाची दखल घेत आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शरद बेंडकुळे, हिरामण बेंडकोळी, भीमराव कडलक, अशोक जाधव, नारायण जाधव, माणिक गायकर, सुमन भदाणे, रत्नमाला कुयटे, लता लहांगे आदी उपस्थित होते.

Demand to curb rising incidents of theft, hooliganism, and drug abuse in the Gangapur Road area.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

18 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

18 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

18 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

19 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

19 hours ago