उत्तर महाराष्ट्र

धानोरे येथील सैन्य दलातील जवानाचा अपघाती मृत्यू

धानोरे येथील सैन्य दलातील जवानाचा अपघाती मृत्यू
लासलगाव: प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील धानोरे येथील रहिवासी असलेला भारतीय सैन्य दलातील जवान श्रीराम राजेंद्र गुजर (वय – २४)हे सुटीवर गावी आले होते.शिर्डी येथून साईबाबाचे देवदर्शन करून सोनेवाडी (ता.कोपरगाव जि.अहमनगर) येथे नातेवाईकांकडून घरी येत असताना दुचाकी पल्सर गाडीचा अपघात झाला.ही घटना १६ जुलैला दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पाथरे(ता.सिन्नर) येथे घडली.श्रीराम यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली असून मंगळवारी दि.१८ रोजी सकाळी ११:०० वाजता श्रीराम यांच्यावर धानोरे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
आसाम(गुवाहाटी) येथे भारतीय सैन्य दलात शिपाई जहाज ऑपरेटर म्हणून कर्तव्यावर होते.पंचवीस दिवसांपूर्वी सुटीवर आलेले श्रीराम राजेंद्र गुजर शिर्डी येथून देवदर्शन करून नातेवाईकांकडून घरी जाण्यासाठी निघाले होते.त्यांच्या पल्सर (एमएच १५. एचए ९००६) मोटरसायकलला समोरून येणाऱ्या प्लॅटिना मोटर सायकलने जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात प्लॅटिनावरील व श्रीराम गंभीर जखमी झाले.श्रीराम यांच्या सोबत असलेला मावसभाऊ अक्षय उर्फ बबलू पांडुरंग जावळे(वय २५. रा. सोनगाव,ता.कोपरगाव) यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर पाथरेचे ग्रामस्थ व पिंपरवाडी टोल नाका मदत पथकाने श्रीराम व अपघातग्रस्तांना शिर्डी येथे साई संस्थान सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.उपचारादम्यान रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात आजोबा संतु,आई अनिता,शेतकरी वडील राजेंद्र,भाऊ नितिन,बहीण प्रियंका असा परिवार आहे.दरम्यान एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आलेल्या श्रीराम नातेवाईकांना भेटून मंगळवार दि.१८ रोजी आपल्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी जाणार होते परंतु दुर्दैवाने त्याच्या आतच काळाने घाला घातला.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीराम यांनी अतिशय हालकीच्या परिस्थिती आपले शिक्षण पूर्ण केले.  दहावीपर्यंतचे शिक्षण रूई येथील न्यू इंग्लिश स्कुल मध्ये घेतले व नंतर बारावीचे शिक्षण विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात पूर्ण करून सैन्यदलात भरती झाले आणि पुणे येथे सेवेला प्रारंभ झाला.श्रीराम हे भारतीय सैन्य दलात बॉम्बे इंजिनिअर कोर २३६ IWT युनिट मध्ये गेल्या सात वर्षांपासून कार्यरत होते.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

13 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago