नाशिक

सातपूर औद्योगिक परिसरात डिझेल चोरांचा धुमाकूळ

चार जड वाहनांमधून डिझेल चोरी

सातपूर : प्रतिनिधी
नाशिकच्या सातपूर औद्योगिक परिसरात डिझेल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सिटीलिंक लॉजिस्टिक्स कंपनीच्या चार जड मालवाहू वाहनांच्या डिझेल टाक्यांचे लॉक तोडून अंदाजे 300 ते 400 लिटर डिझेल चोरी केल्याची घटना घडली.
ही घटना सातपूर येथील उज्ज्वल एजन्सीजसमोर मंदिर परिसरात घडली. चोरी झालेल्या वाहनांचे क्रमांक एनएल 0101 एबी 7053, एनएल 01 एबी 7052, एनएल 01 एबी 8009 आणि एनएल 01 एडी 0709 असे असून, ही सर्व वाहने अशोक लेलँड कंपनीची 14 चाकी मालवाहू
वाहने आहेत.
घटनास्थळासमोरील एका कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात काही संशयित व्यक्ती एका कारमधून येताना आणि जाताना दिसून आल्या. प्राथमिक तपासात संबंधित कारचा क्रमांक एमएच 15 डीसी 7457 असल्याचे आढळले. मात्र, पुढील पोलीस तपासात आरोपींनी चोरीसाठी बनावट (डुप्लिकेट) नंबरप्लेटचा वापर केल्याचे समोर आले आहे. सिटीलिंक लॉजिस्टिक्सचे संचालक ओमप्रकाश यादव यांनी सांगितले की, या घटनेमुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरातील इतर वाहनमालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच औद्योगिक परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. स्थानिक उद्योजक आणि ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांनीही डिझेल चोरीच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली असून, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, सातपूर पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे.

Diesel thieves on the rampage in Satpur industrial area.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago