दोघांसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
सिडको : विशेष प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून बेकरी व्यावसायिकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका महिला आरोपीसह तीन जणांनी बेकरीचा परवाना रद्द करण्याची व व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देत व्यावसायिकांकडून हजारो रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील तिघाही संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील दोघे संशयित एका खासगी लोकल न्यूज चॅनलचे कॅमेरामन आणि प्रतिनिधी तर सदरील महिला एका संस्थेची पदाधिकारी असल्याचे समजते.
याबाबत एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारगिल चौक, दत्तनगर येथील एका बेकरीत 19 जून रोजी सकाळी दोन पुरुष आणि एक महिला आले. त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे बनावट ओळखपत्र दाखवून दुकानातील खाद्यपदार्थांचे फोटो व व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर बेकरीचा परवाना रद्द करण्याची तसेच दुकान बंद करण्याची धमकी देत संबंधित व्यावसायिकाकडून 15 हजार रुपये रोख आणि तीन हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतल्याचा आरोप आहे. तसेच याच दिवशी दुपारी द्वारका परिसरातील आणखी एका व्यावसायिकालाही खाद्यपदार्थांमध्ये भेसळ असल्याची भीती दाखवून 15 हजार रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रिजवान इब्राहिम खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोशन चांगदेव गव्हाणे (रा. महाकाली चौक, सिडको), विजय चुनीलाल बागूल आणि राजनंदिनी उर्फ रागिणी संतोष अहिरे (रा. जेलरोड, नाशिकरोड) यांच्याविरुद्ध फसवणूक व खंडणी उकळल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Fraud against bakery business owners
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…