संपादकीय

शासनाच्या दुष्काळ यादीत निफाडवर दुजाभाव

– आनंदा जाधव
यंदा निफाड तालुक्यात 34,140 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची लागवड करण्यात आली. यातील सोयाबीन पिकाच्या शेंगा भरत आहेत, तर मका पिकाची कणसे परिपक्व होत आहेत. गळीत आणि तृणधान्यदेखील सुस्थितीत आहे. आतापर्यंत निफाड तालुक्यात 321 मिमी पावसाची नोंद झाली असून, मागील वर्षीदेखील इतकाच पाऊस पडला होता. शासनाने नुकत्याच दुष्काळाची घोषणा केली असली, तरी यात निफाडला डावलल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.

निफाडमध्ये कादवा, गोदावरी, दारणा नद्या, तसेच चारही बाजूने वाहणारे कालवे यामुळे निफाड तालुका सुजलाम् सुफलाम् झाला आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामातील पिकेदेखील जोमदार आहेत. मात्र, सध्या कुठल्याच पिकांना समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरीवर्गात नाराजीचा सूर ऐकू येत आहे. यंदा खरिपाचा हंगाम यशस्वी झाला असला, तरी पुढील रब्बी हंगामासाठी पाऊस गरजेचा आहे. शेतकरी वर्गाच्या म्हणण्यानुसार यंदा पाऊस अत्यल्प झाला आहे, तर शासकीय अधिकार्‍यांच्या मते मागील वर्षाइतकाच पाऊस यंदा पडला आहे. कारण जून कोरडा गेला असला, तरी जुलैमध्ये मागील वर्षी 106 मिमी पडलेला पाऊस. तब्बल 305 मिमी पावसाची नोंद झाली म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत 287 मिमी पाऊस जास्त बरसला. ऑगस्टमध्ये 112 मिमी पाऊस अपेक्षित असताना त्याची अवघी 95 मिमी नोंद झाली. अद्याप सप्टेंबरची आकडेवारी येणे बाकी असले, तरी यंदा आत्तापर्यंत सरासरी 321 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
यंदा खरीप हंगामात मका 13,115 हेक्टर, तर सोयाबीन 20,868 हेक्टर, तृणधान्य 13,161 हेक्टर आणि गळीत धान्य 20,931 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ही पिके सुस्थितीत आहेत. सध्या पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, पुढील कांदा पिकासाठी पाऊस गरजेचा आहे. मात्र, समाधानाची बाब म्हणजे हवामान विभागाने 4 ऑक्टोबरपासून पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
निफाड तालुक्याला कॅलिफोर्निया, हिरवा पट्टा, तसेच द्राक्षपंढरी या नावाने ओळखले जाते. मात्र, अलीकडे त्यास काही प्रमाणात गालबोट लागताना दिसत आहे. कारण निसर्गाचा लहरीपणा, रोगांचा प्रादुर्भाव आणि कोसळणारे बाजारभाव यामुळे शेती आता जुगार ठरू लागली आहे. मागील वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे 21 हजार हेक्टर क्षेत्रापैकी अवघ्या 8,400 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षवेलींना फळधारणा झाली. परिणामी, 60 टक्के क्षेत्रावरील द्राक्षबागा उभ्या राहिल्या. यावर्षी द्राक्ष पिकासाठी पोषक वातावरण असल्याने तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्‍यांनी द्राक्षबाग छाटणीला सुरुवात केली आहे. पश्चिम भागातील शेतकरी छाटणीपूर्व कामे पूर्ण करण्यात व्यस्त झाला आहे. तालुक्यातील शेतकरी नगदी पिकाला प्राधान्य देत आला आहे. त्यामुळे द्राक्षाबरोबरच उन्हाळ कांदा पिकाचे उत्पादनदेखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याखालोखाल भाजीपाला पिकाला शेतकरी प्राधान्य देतात. एकेकाळी तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर ऊस पिकाची लागवड केली जात असे; परंतु तालुक्यातील साखर कारखानदारी कोलमडल्याने शेतकरी मका, सोयाबीन, टोमॅटो आणि भाजीपाला पिकाकडे वळला. सध्या तालुक्यात टोमॅटो हंगाम नुकताच सुरू झाला असतानाच बाजारभावात मात्र घसरण होत असल्याने आता टोमॅटो पिकासाठी झालेला खर्च फिटणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता उन्हाळ कांदा लागवड करणे हाच शेतकर्‍यांपुढे पर्याय उरला आहे. मात्र, या कांदा लागवडीसाठी पुरेसा पाऊस होणे गरजेचे आहे, अन्यथा उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट गडद होऊन कांदा पीकदेखील वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तविला असला तरी या विभागाचे अंदाज अनेक वेळा चुकले आहेत. त्यामुळे आता वरुणराजाने बरसावे आणि शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजाला या हंगामात पावसाने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे आता पाऊस झाला नाही तर रब्बीचा हंगाम घेणे अवघड होणार आहे. कारण धरणात असलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाईल. परिणामी, कालव्यांना आता पाणी येण्याची अपेक्षा धूसर झाली आहे. परिणामी, रब्बी हंगामासह उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. साहजिकच निफाड, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांना एकाच वर्षी ओला आणि कोरडा अशा दोन्ही दुष्काळांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी तर पावसाळ्यात सरकारला कोरडा दुष्काळाची घोषणा करावी लागली. यावरूनच पुढे पाणीटंचाईची काय अवस्था होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. त्यामुळे सरकारने जरी आता दुष्काळ जाहीर केला असला, तरी प्रत्यक्ष शेतकर्‍याला मदत देण्यास बराच उशीर होणार आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा छावण्या, स्वस्त धान्य दुकानातून जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा आणि टँकरने पाणीपुरवठा यासाठी आत्तापासूनच योग्य नियोजन होणे गरजेचे आहे.

Discrimination against Niphad in government’s drought list

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago