नाशिक

खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास बडतर्फीची कारवाई

महावितरणचे आदेश : तांत्रिक कर्मचार्‍यांवरच कामाची जबाबदारी

नाशिक : प्रतिनिधी
महावितरणच्या वीज यंत्रणेमधील नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बदलणे, तांत्रिक दुरुस्ती, वीजबिल वसुली किंवा मीटर काढणे यांसारखी कामे विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करून करण्याची पूर्णतः जबाबदारी तारमार्ग संवर्गातील तांत्रिक कर्मचार्‍यांची आहेत. अशी तांत्रिक व जोखमीची कामे करवून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारे खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करू नये. असे प्रकार आढळल्यास व विद्युत अपघात झाल्यास संबंधित दोषी कर्मचार्‍यांविरुद्ध बडतर्फीसारखी कठोर कारवाई करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी नुकतेच परिपत्रक काढून क्षेत्रीय मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांना याबाबत खातरजमा करण्याचे आदेश दिले आहेत.

महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे सुरक्षित संचालन, देखभाल व दुरुस्ती आणि ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करणे हे प्रत्येक संबंधित अभियंता व तांत्रिक कर्मचार्‍यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. वीज यंत्रणेमध्ये प्रत्यक्ष कामे करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तारमार्ग संवर्गामध्ये प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या कर्मचार्‍यांवर नादुरुस्त वितरण रोहित्र बदलणे, डीओ फ्यूज बदलणे, विद्युत वाहिनीमधील बिघाड शोधणे, वीज पुरवठ्याच्या ग्राहक तक्रारी सोडवणे, वीजबिलांची वसुली करणे आणि थकबाकीदार ग्राहकांचे मीटर काढून आणणे यासारख्या कामांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तथापि, महावितरणचे काही तारमार्ग कर्मचारी ही कामे स्वतः करण्याऐवजी खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करून घेत असल्याचे प्रकार निदर्शनास आले
आहे.
’सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी (मेझर्स रिलेटिंग टू सेफ्टी अ‍ॅण्ड इलेक्ट्रिक सप्लाय) रेग्युलेशन्स 2023’मधील नियम 3 नुसार केवळ अधिकृत व्यक्तीच वीज वितरण सेवेशी संबंधित कामे करू शकते किंवा विद्युतवाहिन्या व उपकरणांवर काम करण्यास पात्र असते. त्यामुळे महावितरणकडून अधिकृतपणे नामनिर्देशित न केलेल्या किंवा अपात्र खासगी व्यक्तीस वीज यंत्रणेवर कोणत्याही प्रकारचे काम करण्यास परवानगी देणे अथवा त्याच्याकडून काम करून घेणे, हे पूर्णपणे बेकायदेशीर व अनधिकृत कृत्य आहे. महावितरणच्या सेवाविनियमांनुसार ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तणुकीत मोडते. या सर्व गंभीर बाबींची दखल घेत महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी परिपत्रकाद्वारे निर्देश जारी केले आहेत.

Dismissal action if work is got done through private individuals.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

2 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

2 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

2 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

2 hours ago