नाशिक

आम्ही सर्व एक आहोत… ज्ञानकुंभातून एकात्मतेचा संदेश

नाशिक : प्रतिनिधी
सनातन वैदिक धर्मपरंपरा, शास्त्रशुद्ध चिंतन आणि जागतिक पातळीवर हिंदू समाजाला प्रमाणाधारित धर्मशास्त्रीय मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने नाशिकमध्ये दोन दिवसीय ज्ञानकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आम्ही सर्व एक आहोत; यामध्ये कोणताही वाद, जातिवाद, धर्मवाद किंवा प्रांतवाद नाही, असा एकात्मतेचा संदेश देत महंत अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी दिला.
या ज्ञानकुंभासाठी महंत भक्तिचरण दास महाराज, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, सुनील घनवट, लक्ष्मण सावजी, आकाश छाजेड यांच्यासह श्री काशी विद्वत धर्मपरिषद, अखिल भारत हिंदू महासभा, आखाडा परिषद, त्र्यंंबकेश्वर पुरोहित संघ, नाशिक पुरोहित संघ, आध्यात्मिक आघाडी, सनातन संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना महंत अनिकेतशास्त्री म्हणाले, की कुंभमेळा पाचशे वर्षांपूर्वीचा नसून अनादि, प्राचीन आहे. त्याचे दाखले वेद, पुराणे आणि शिवपुराणात स्पष्टपणे मिळतात. हा ऐतिहासिक व शास्त्रीय पुरावा समाजासमोर आणण्यासाठी पाचशे पानांचा सर्वसमावेशक अहवाल केंद्र व राज्य शासनाला सादर केला जाईल. तसेच गेल्या 50 वर्षांत सनातन धर्मावर झालेले अन्याय दूर होत असले, तरी शासनाने ध्वजारोहण व कुंभविधी पूर्णपणे शास्त्रोेक्त पद्धतीने पार पाडण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वामी अक्षय्यानंद वृंदावनधाम येथील जगदगुरू शंकराचार्य दीक्षित नैष्ठिक संन्यासी स्वामी श्री अक्षय्यानंद महाराज यांनी सांगितले की, कुंभमेळा हा अत्यंत पवित्र आणि उत्साहाचा सोहळा असतो. मात्र, नियोजनात प्रशासनाकडून काही उणिवा जाणवत
आहेत.
यासाठी सर्व आखाडे, महंत आणि प्रशासनाने समन्वय साधून तोडगा काढणे गरजेचे आहे. ज्ञानकुंभातील उच्चविद्याविभूषित महंतांचे विचार लक्षात घेऊनच सरकारने आपली भूमिका ठरवावी.

कुंभमेळ्यात परधर्मीयांना प्रवेश नको : रणजित सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी कुंभमेळ्याच्या पावित्र्याबाबत रोखठोक भूमिका मांडली. हिंदूंच्या या सर्वोच्च धार्मिक उत्सवात व कुंभमेळ्यात इतर धर्मीयांना प्रवेश दिला जाऊ नये, असा स्पष्ट आदेश संत-महंतांनी द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तेराच आखाडे, महिलांचा स्वतंत्र आखाडा नाही : भगवान बाबा
त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे महामंडलेश्वर 1008 महंत शंकरानंद सरस्वती महाराज (भगवान बाबा) यांनी स्पष्ट केले की, परंपरेनुसार केवळ 13 आखाडेच अस्तित्वात असून, नवीन आखाडा तयार होऊ शकत नाही आणि त्याला शासन वा प्रशासन मान्यता देऊ शकत नाही. अमृतस्नानाची वेळ व काळ निश्चित असतेे. सनातन परंपरेत लिंगभेद मानला जात नाही; विद्यमान आखाड्यांमध्येही महिलांचा सहभाग असतो. त्यामुळे महिलांसाठी वेगळा आखाडा होणार नाही आणि तशी परवानगी दिली जाणार नाही. त्र्यंबकेश्वरची नागा परंपरा अखंड राहील आणि या ज्ञानकुंभाच्या माध्यमातून राष्ट्र एकसंध ठेवण्याचे कार्य केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

We are all one… a message of unity from the ‘Knowledge Pitcher’ (Dnyankumbh).

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

2 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

2 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

3 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

3 hours ago