सात तालुक्यांतील महसूल सेवा अधिक सुलभ
मालेगाव : प्रतिनिधी
भूमी अभिलेखविषयक सेवा नागरिकांना अधिक कार्यक्षम, गतिमान आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, नाशिक क्रमांक 2 मालेगाव यांचे नवीन कार्यालय मालेगाव येथील नवीन तहसील कार्यालयाच्या तिसर्या मजल्यावर कार्यान्वित करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भूमी अभिलेख व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
नवीन कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, नाशिक क्रमांक 1 हेमंत सानप यांच्या हस्ते सोमवारी (दि. 15) सकाळी करण्यात आले. यावेळी तहसीलदार विशाल सोनवणे, उपअधीक्षक भूमी अभिलेख अल्पेश पाटील, चांदवडचे उपअधीक्षक भूमी अभिलेख भाबड, नगरभूमापन अधिकारी पी. के. चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मालेगाव, बागलाण, देवळा, कळवण, नांदगाव, येवला आणि चांदवड या सात तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना भूमी अभिलेखाशी संबंधित विविध सेवा स्थानिक पातळीवर अधिक वेगाने उपलब्ध होणार आहेत. नवीन कार्यालयामुळे विविध सेवांसाठी लागणारा कालावधी कमी होऊन नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. तक्रारींचे वेळेत निवारण करण्यास मदत मिळणार आहे.
महसूल प्रशासनातील पारदर्शकता वाढून भूमी अभिलेख व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. दरम्यान, उपलब्ध सुविधांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, नाशिक क्रमांक 1 सानप यांनी केले आहे.
District Superintendent of Land Records office inaugurated in Malegaon.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…