नाशिक

’तो’ वाद गंगापूररोड परिसरातील फाइलवरून?

नगरसेवक-अभियंता प्रकरण

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेतील नगररचना विभागात नाशिकरोडचे भाजप नगरसेवक सतीश निकम यांनी कनिष्ठ अभियंता प्रदीप भामरे यांना शिवीगाळ करत धमकावल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला होता. यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान, ज्या फाइलसाठी निकम यांनी आदळआपट केली, ती फाइल त्यांच्या प्रभाग 20 मधील नव्हे, तर गंगापूररोड परिसरातील कामासंदर्भातली असल्याचे समोर आल्याने यावरून जोरदार चर्चा रंगली आहे.
निकम यांनी घातलेल्या वादानंतर कनिष्ठ अभियंता प्रदीप भामरे यांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार करत स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. या घटनेची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून, प्रशासन या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे. या फुटेजच्या आधारे वस्तुस्थिती समोर आल्यानंतर याप्रकरणी कारवाईसाठी पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वादाच्या केंद्रस्थानी असलेली ती फाइल गंगापूररोड परिसरातील असल्याने निकम यांचा एवढा अट्टाहास का? अशी चर्चा होत आहे. ही फाइल वादग्रस्त असल्यानेच अभियंता भामरे यांनी त्यावर कार्यवाही केली नसल्याचे बोलले जाते. सतीश निकम प्रभाग 20 चे नगरसेवक असताना गंगापूररोड परिसरातील कामाशी त्यांचा काय संबंध? आणि त्यासाठी नगररचना विभागात त्यांच्याकडून एवढा पाठपुरावा का केला जात होता, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

मनपा आयुक्त घेणार बैठक
अभियंता आणि भाजप नगरसेवकातील वादाप्रकरणी सोमवारी (दि. 15) आयुक्त मनीषा खत्री संबंधितांची बैठक घेणार होत्या. मात्र, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक मुंबईला रवाना झाले. त्यामुळे प्रस्तावित बैठक न झाल्याने आयुक्त दोन्ही बाजूंची भूमिका आठवड्यानंतरच ऐकून घेणार असल्याचे समजते.

चांगली वागणूक दिली नाही
प्रभाग क्रमांक 12 तील आपल्या एका परिचित व्यक्तीचे काम असल्याने त्यासंदर्भात मी अधिकार्‍यांना विचारणा केली. जर त्या फाइलमध्ये काही चुकीचे असेल तर त्यावर काम करू नका; परंतु लोकप्रतिनिधी म्हणून आदराने बोलायला हवे. त्या दिवशी आपल्याशी संबंधितांनी चुकीचे वर्तन केले.
– सतीश निकम, नगरसेवक, भाजप

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago