येवला : प्रतिनिधी
शहराला कुस्तीचा समृद्ध आणि ऐतिहासिक वारसा लाभला असून, या परंपरेचे जतन करण्याचे काम लोणारी कुटुंबासह अनेक कुस्तीप्रेमींनी सातत्याने केले आहे. ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत अधिक भक्कमपणे पोहोचवणे गरजेचे आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला सातत्याने प्रोत्साहन दिले जात असून, येवल्यातील कुस्तीपटूंना सरावासाठी अत्याधुनिक कुस्ती मॅट लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली.
क्रीडा व युवकसेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने येवल्यातील कै. भाऊलाल लोणारी क्रीडासंकुलात विभागीय कुस्ती स्पर्धांचे उद्घाटन माजी खासदार भुजबळ यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
माजी खासदार भुजबळ म्हणाले की, येवल्यातील अनेक कुस्तीपटूंनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता व जिद्द मोठ्या प्रमाणात असते; परंतु त्यांना योग्य प्रशिक्षण, आधुनिक साधनसामग्री आणि दर्जेदार क्रीडा सुविधा मिळणे आवश्यक आहे.
याप्रसंगी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, जिल्हा क्रीडा अधिकारी दत्तू भोकनळ, पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक, सभापती वसंतराव पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजी पवार, माजी नगराध्यक्ष भोलाशेठ लोणारी, गोरख बलकवडे, नगरसेवक प्रवीण बनकर, दीपक लोणारी, प्रभाकर झळके, नवनाथ काळे, सुभाष पाटोळे, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, चेतन थोरात आदी उपस्थित होते.
Divisional wrestling competition held with great enthusiasm in Yeola.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…