त्र्यंबकेश्वरला पूर्व दरवाजा दर्शनबारीत भाविकांचा संतप्त सवाल
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट प्रशासनाने आगामी गर्दीचा अंदाज घेत 3 ते 12 ऑक्टोबर 2026 दरम्यान ‘व्हीआयपी दर्शन बंद’ ठेवण्याचे जाहीर पत्रक काढले आहे. मात्र, प्रत्यक्षात रविवारी मंदिर परिसरात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सशुल्क दर्शन (200 रुपये), 2500 रुपयांची देणगी पावती आणि विशेष पासधारकांचे येणे-जाणे सुरळीत सुरू असताना, 7 ते 8 तास पूर्व दरवाजाच्या रांगेत ताटकळत उभे राहिलेल्या सामान्य भाविकांमधून “व्हीआयपी दर्शन बंद म्हणजे नेमके काय?” असा सवाल विचारला जात होता.
यापूर्वीही अनेकदा व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याच्या घोषणा झाल्या आहेत, मात्र प्रत्यक्षात सर्व प्रकारची विशेष दर्शने बिनबोभाट सुरूच असतात. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले. प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, राज्य किंवा केंद्रीय स्तरावरून तसेच जिल्हाधिकार्यांच्या राजशिष्टाचाराच्या पत्रानुसार येणार्या व्हीआयपींना वगळून इतर दर्शन बंद ठेवल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे शिष्टाचाराच्या नावाखाली व्हीआयपींची ये-जा सुरूच राहिल्याने या घोषणेला काहीच अर्थ उरलेला नाही, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.
गर्भगृहाच्या दारात पोहोचताच कर्मचार्यांकडून मिळणारा धक्काबुक्कीचा अनुभव श्रद्धेला धक्का देणारा ठरत आहे. जर खरोखरच सर्वसामान्यांना वेळेत व समाधानकारक दर्शन द्यायचे असेल तर सर्व प्रकारचे व्हीआयपी व शिष्टाचाराचे दर्शन पूर्णपणे सरसकट बंद ठेवण्याची गरज असल्याची मागणी त्र्यंबकेश्वर आगमनानंतर भाविकांमधून तीव्रतेने होत आहे.
सामान्यांचे हाल अन् सुविधांचा अभाव
एकीकडे व्हीआयपी आणि सशुल्क दर्शन सुरू असताना, प्रामाणिकपणे पूर्व दरवाजाच्या दर्शनबारीत तासन्तास उभे राहिलेल्या सामान्य भाविकांचे मात्र अतोनात हाल होत आहेत. रांगेत पिण्याच्या पाण्याची व अपूर्ण प्रकाशव्यवस्था, स्वच्छतागृहांचा अभाव आणि वारंवार थांबवली जाणारी रांग अशा अनेक त्रुटींचा सामना सामान्य भाविकांना करावा लागत आहे.
What exactly does ‘VIP darshan suspended’ mean?
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…