संविधानप्रेमी नागरिकांची महानगरपालिका कार्यालयासमोर निदर्शने
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या पाच नागरिकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर संविधानप्रेमी नाशिककर यांच्या वतीने काल नाशिक महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी महापौर हिमगिरी आडके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने महापौरांसोबत चर्चा करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
संविधानप्रेमी नाशिककरांच्या निवेदनात म्हटले आहे की, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक विकासकामे व रस्त्यांची कामे एकाच वेळी सुरू करण्यात आली आहेत. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आली असून, पावसामुळे मोठमोठे खड्डे व चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, गेल्या चार महिन्यांत पाच निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
खड्ड्यांमुळे झालेल्या पाच मृत्यूंप्रकरणी दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई होईपर्यंत संविधानप्रेमी नाशिककरांचा पाठपुरावा सुरू राहील. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी ‘नाशिक खड्डेमुक्त करा,’ ‘मृत्यूस जबाबदारांवर गुन्हे दाखल करा,’ ‘कुंभमेळामंत्री राजीनामा द्या,’ ‘कुंभमेळा प्राधिकरण रद्द करा,’ ‘कुंभ आयुक्त मुर्दाबाद,’ ‘आयुक्त खत्री, महापौर रील नको, रिअल काम करा, नाशिककरांना वाचवा,’ अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात राजू देसले, प्रभाकर वायचळे, अजमल खान, तानाजी जयभावे, तल्हा शेख, प्राजक्ता कापडणे, विजय बागूल, मीना आढाव, कृष्णा शिलावाट, बंडू डांगे, राम बागूल, मनोहर पगारे, अमोल लोणारी, नीलेश सोनवणे, प्रल्हाद मिस्त्री, आशा लांडगे, मोनिका पागे, निखिल लोणारी, नाझीम पठाण, राहुल गायकवाड, विनायक येवले, पद्माकर इंगळे यांच्यासह संविधानप्रेमी नाशिककर मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
Don’t use reels, fill real holes.
- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…
- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…
- जगन घाणेकर यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…
तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…
नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…
समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…