नाशिक

साईबाबा हॉस्पिटलमध्ये 9 ला अत्याधुनिक सुविधांचा शुभारंभ

नाशिक : प्रतिनिधी
श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे हृदयरोग निदान आणि उपचार क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधांचा शुभारंभ रविवार, दि. 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता प्लॉट क्र. 38/पी, वाणी हाउससमोर, मुंबई नाका येथे होणार आहे. या नव्या सुविधांमुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या हृदयरोग निदान व उपचार सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून, विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी अत्याधुनिक 128 स्लाईस हृदय संगणकीय तपासणी यंत्राद्वारे सीटी कोरोनरी अँजिओग्राफी, सिमेन्स आर्टिस वन एडिशन एक्स हृदय रक्तवाहिनी तपासणी प्रयोगशाळा, तसेच अंतःरक्तवाहिनी अल्ट्रासोनोग्राफी (आयव्हीयूएस) आणि रक्तप्रवाह मापन (एफएफआर) मार्गदर्शित अँजिओप्लास्टी या सुविधा सुरू करण्यात येणार आहेत.
सीटी कोरोनरी अँजिओग्राफी ही हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या धमन्यांची आधुनिक, प्रगत आणि विना-आक्रमक तपासणी आहे. या तपासणीमध्ये पारंपरिक अँजिओग्राफीप्रमाणे शरीरात नळी टाकण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे कमी वेळेत आणि अधिक सुरक्षित पद्धतीने हृदयाच्या धमन्यांची तपासणी करता येते. अंतःरक्तवाहिनी अल्ट्रासोनोग्राफी हे हृदयरोग उपचारातील प्रगत प्रतिमांकन तंत्रज्ञान असून, त्याद्वारे रक्तवाहिन्यांच्या आतील भागाची अचूक तपासणी करता येते. या पद्धतीमध्ये अतिशय बारीक नळीच्या टोकावरील अल्ट्रासोनोग्राफी उपकरणाद्वारे रक्तवाहिन्यांचे त्रिमितीय चित्र संगणकावर तयार केले जाते. ही तपासणी आक्रमक असली तरी सुरक्षित मानली जाते.
या अत्याधुनिक सुविधांमुळे हृदयरोगांचे अचूक निदान, कमी वेळेत तपासणी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार तसेच अधिक सुरक्षित अँजिओप्लास्टी करणे शक्य होणार आहे. श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या दोन अत्याधुनिक हृदय रक्तवाहिनी तपासणी प्रयोगशाळा, 200 खाटांचे सुसज्ज रुग्णालय, अनुभवी हृदयरोगतज्ज्ञांची टीम तसेच कार्डियाक एमआरआय यांसारख्या प्रगत सुविधा उपलब्ध आहेत. हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. पल्लवी धर्माधिकारी, डॉ. ऐश्वर्या धर्माधिकारी, विश्वजित धर्माधिकारी आणि डॉ. अध्वर्यू कुथे यांनी नागरिकांनी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

State-of-the-art facilities inaugurated at Saibaba Hospital

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोगरा फुलला

- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…

7 hours ago

समावेशित शिक्षणातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा

- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…

7 hours ago

रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

- जगन घाणेकर  यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…

8 hours ago

बंडाळी चव्हाट्यावर!

तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…

8 hours ago

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात

नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…

8 hours ago

वैद्यकीय सुविधेचा स्थायी सदस्यांकडून पंचनामा

समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…

8 hours ago