महाराष्ट्र

डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोल्हापूर :
अनेकांना जगण्याचे बळ देणारे, लाखो विद्यार्थ्यांचे जीवन शिक्षणाने उजळवणारे आणि देशाच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा देणारे थोर शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील काल अनंतात विलीन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. बुधवारी सायंकाळी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिरंग्यात लपेटलेल्या दादांच्या पार्थिवाला पोलीस पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून
मानवंदना दिली.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी कसबा बावडा येथील त्यांच्या ‘यशवंत निवास’ या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून जनसागर लोटला होता. सायंकाळी 4 वाजता यशवंत निवासस्थानावरून फुलांनी सजवलेल्या वाहनातून दादांची अंतिम यात्रा सुरू झाली. ही यात्रा मेडिकल कॉलेज, लाइन बाजार, भगवा चौक, कसबा बावडा मेन रोड, श्रीराम सोसायटी रस्ता, गवत मंडई आणि फायर स्टेशन मार्गे पॅव्हेलियन मैदानावर पोहोचली. संपूर्ण मार्गावर हजारो नागरिकांनी आपल्या मार्गदर्शकावर पुष्पवृष्टी केली. ‘अमर रहे, अमर रहे, डी. वाय. दादा अमर रहे’ अशा भावुक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. डॉ. पाटील यांच्या अंत्यविधीसाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील नेत्यांची मोठी उपस्थिती होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांना ’ज्ञानाचा महासागर’ आणि ’अजातशत्रू’ नेता म्हणून श्रद्धांजली वाहिली. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दादांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांच्या आठवणींना उजाळा दिला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही कोल्हापुरात येऊन 40 वर्षांच्या जुन्या मैत्रीला साश्रू नयनांनी निरोप दिला. अंत्यसंस्कार प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण केलं. यासह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, उबाठा नेते अंबादास दानवे, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, विश्वजित कदम, आमदार विनय कोरे, राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती यांसह अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

पॅव्हेलियन मैदानावर लोटला जनसागर

आपल्या नेत्याला निरोप देण्यासाठी कोल्हापूरकरांनी पॅव्हेलियन मैदानावर प्रचंड गर्दी केली. या ठिकाणी डॉ. डी. वाय पाटील यांचे पार्थिव आल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर डी. वाय. पी. ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. या भावनिक क्षणी अखेर उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी आमदार सतेज पाटील, विजय पाटील, अजिंक्य पाटील, ऋतुराज पाटील आणि पाटील कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Dr. D. Y. Patil cremated with state honours.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोगरा फुलला

- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…

11 hours ago

समावेशित शिक्षणातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा

- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…

11 hours ago

रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

- जगन घाणेकर  यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…

12 hours ago

बंडाळी चव्हाट्यावर!

तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…

12 hours ago

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात

नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…

12 hours ago

वैद्यकीय सुविधेचा स्थायी सदस्यांकडून पंचनामा

समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…

12 hours ago