नाशिक

राज्यातील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने दिलासा

मुंबई : प्रतिनिधी
जलसंपदा विभागाच्या 5 ऑगस्ट रोजीच्या अधिकृत अहवालानतून महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि बळीराजासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. जलसंपदा विभागाच्या ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण 3,029 लहान-मोठ्या धरणांमध्ये 70.39टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. राज्यातील 138 मोठ्या धरणांनी 80टक्क्यांचा टप्पा ओलांडला असून, पुणे आणि कोकण विभागात अनेक धरणे 100टक्के क्षमतेने भरली आहेत.
राज्यातील 6 महसुली विभागांमधील सर्व प्रकल्पांची (मोठे, मध्यम व लघु) स्थिती खालीलप्रमाणे आहे :
पुणे विभाग ( 84.02टक्के)
पुणे विभागाने यंदा पाणीसाठ्यात उत्तम कामगिरी केली आहे. विभागातील 35 मोठ्या धरणांमध्ये 92.01टक्के जलसाठा जमा झाला आहे. 100टक्के भरलेली प्रमुख धरणे : खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, भाटघर, चासकमान आणि ठोकरवाडी (टाटा). इतर प्रमुख धरणे : नीरा देवघर (97.42टक्के), डिंभे (95.34टक्के), पवना (97.14टक्के) आणि उजनी (99.18टक्के).
कोकण विभाग (85.92टक्के)
मुंबई व ठाणे परिसराला पाणीपुरवठा करणारी तानसा (99.09टक्के) आणि मोडकसागर (99.96टक्के) ही धरणे पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत.
नाशिक विभाग (84.31 टक्के)
नाशिक विभागात मोठ्या धरणांची स्थिती अत्यंत मजबूत असून, तेथे 84.31 टक्के साठा झाला आहे. 100टक्के भरलेली धरणे : भाम, ओझरखेड, तिसगाव आणि वाघड. इतर प्रमुख धरणे : गिरणा (99.22 टक्के), गंगापूर (85.87 टक्के), मुळा (78.29 टक्के) आणि भंडारदरा (95.53टक्के).

पाणीप्रश्न सुटला
पुणे, मुंबई, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य धरणांमध्ये पुरेसा साठा झाल्यामुळे पुढील काही महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. शेती आणि पिकांसाठी पोषक : मोठ्या धरणांमधील 80 टक्के हून अधिक साठ्यामुळे आगामी रब्बी हंगामासाठी सिंचनाचे नियोजन करणे शेतकर्‍यांना सुलभ होईल. योग्य वापर आवश्यक : जरी साठा समाधानकारक असला, तरी जलसंपदा विभागाने पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याचे नियोजनपूर्वक वापर करण्याचे आवाहन केले आहे.

 

Relief as many dams in the state fill to full capacity.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोगरा फुलला

- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…

15 hours ago

समावेशित शिक्षणातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा

- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…

16 hours ago

रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

- जगन घाणेकर  यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…

16 hours ago

बंडाळी चव्हाट्यावर!

तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…

16 hours ago

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात

नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…

16 hours ago

वैद्यकीय सुविधेचा स्थायी सदस्यांकडून पंचनामा

समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…

16 hours ago