नाशिक

मौजमजेसाठी दुचाकींची चोरी

चार विधिसंघर्षित बालके ताब्यात; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सिडको : प्रतिनिधी
मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणार्‍या चार विधिसंघर्षित बालकांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून 2 लाख 75 हजार रुपये किमतीच्या 11 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे नाशिक शहरासह पालघर आणि धुळे जिल्ह्यातील एकूण नऊ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस
आले आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अंमलदार अर्जुन कांदळकर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार दत्तनगर, अंबड परिसरात सापळा रचून चार विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे चार, गंगापूर पोलीस ठाण्याचे दोन, सातपूर पोलीस ठाण्याचा एक, पालघर जिल्ह्यातील मोखाडा पोलीस ठाण्याचा एक आणि धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा पोलीस ठाण्याचा एक असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले. तसेच अन्य दोन चोरीच्या दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये प्रामुख्याने हिरो स्प्लेंडर, हिरो स्प्लेंडर प्रो, बजाज बॉक्सर आणि होंडा युनिकॉर्न या दुचाकींचा समावेश आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नऊटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील, संदीप शेवाळे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.

Theft of two-wheelers for fun

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोगरा फुलला

- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…

15 hours ago

समावेशित शिक्षणातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा

- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…

16 hours ago

रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

- जगन घाणेकर  यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…

16 hours ago

बंडाळी चव्हाट्यावर!

तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…

16 hours ago

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात

नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…

16 hours ago

वैद्यकीय सुविधेचा स्थायी सदस्यांकडून पंचनामा

समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…

16 hours ago