सिडको : प्रतिनिधी
रिक्षातून प्रवास करताना महिलेच्या बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि बँकेची कागदपत्रे असा एकूण 2 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना नांदूर नाका परिसरात घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलका गोरख पाटील (वय 69, रा. संस्कृती अपार्टमेंट, जयभवानी रोड, नाशिक) या काही दिवस मुलाकडे राहण्यासाठी कन्नड येथून नाशिकला येत होत्या. 7 ऑगस्ट रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास त्या वैजापूर येथून नाशिककडे येण्यासाठी एसटी बसने निघाल्या. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या औरंगाबाद नाका येथे उतरल्या.
तेथून बिटकोकडे जाण्यासाठी त्यांनी रिक्षा पकडली. रिक्षात आधीच एक महिला आणि दोन पुरुष प्रवासी बसले होते. पाटील रिक्षात बसल्यानंतर चालकाने त्यांची बॅग रिक्षाच्या मागील बाजूस ठेवली. नांदूर नाका येथे सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्या
रिक्षातून उतरल्या.
घरी पोहोचल्यानंतर त्यांनी बॅग तपासली असता त्यातील सोन्याचे दागिने, 70 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच बँकेची कागदपत्रे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरी झालेल्या ऐवजात सोन्याची पोत, कानातील दागिने आणि तीन सोन्याच्या अंगठ्यांसह चांदीच्या साखळ्या, रोख रक्कम, बँक पासबुक व मुदत ठेवीची कागदपत्रे यांचा समावेश आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Travel by rickshaw; valuables worth ₹2.86 lakh stolen from woman’s bag.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…