नाशिक

अंबडला रस्ता खचल्याने डंपर अडकला खड्ड्यात

आठवड्याभरात दुसरी घटना; तात्पुरत्या डागडुजीवर नाराजी

सिडको : प्रतिनिधी
पाथर्डी फाटा ते अंबड गाव या मार्गावर स्मार्ट सिटीच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी केल्यानंतर पुन्हा रस्ता खचल्याची घटना गुरुवारी (दि. 3) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. अंबड गावाजवळील महाराजा हॉटेलसमोर मुरूम टाकलेल्या भागावरून मातीने भरलेला डंपर जात असताना अचानक रस्ता खचून त्यात डंपर अडकला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
स्मार्ट सिटीच्या कामासाठी काही दिवसांपूर्वी या ठिकाणी रस्ता खोदण्यात आला होता. काम झाल्यानंतर खोदलेला भाग मुरूम टाकून तात्पुरता बुजविण्यात आला होता. मात्र, कायमस्वरूपी दुरुस्ती न केल्याने अवजड वाहनांचा भार रस्त्याला सहन झाला नाही. परिणामी, रस्त्याचा काही भाग पुन्हा खचला. माती घेऊन जाणारा डंपर या मार्गावरून जात असताना त्याचे चाक रस्त्याच्या खचलेल्या भागात अडकले. त्यामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा असल्याने रस्त्याची सुरक्षितता आणि मजबुतीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, याच मार्गावर अवघ्या आठवडाभरात वाहन रस्त्यात फसण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी अंबड वजनकाट्याजवळ ट्रक रस्त्यात फसला होता. त्यानंतर आता डंपर खड्ड्यात अडकल्याने स्मार्ट सिटीच्या कामानंतर रस्त्याची करण्यात येणारी तात्पुरती दुरुस्ती कितपत टिकाऊ आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Dumper gets stuck in a pothole after the road caves in at Ambad.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

16 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

16 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

16 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

16 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

16 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

17 hours ago