गांडोळे, भनवड परिसर हादरला
ननाशी : वार्ताहर
दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील गांडोळे व भनवड परिसरात गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भूकंपाची रिश्टर स्केलवर 3.7 आणि 2.5 इतकी तीव्रता नोंदविल्याची माहिती मिळाली आहे.
धक्क्यांदरम्यान भूगर्भातून गडगडाटासारखा आवाज ऐकू आल्याचे, तसेच जमीन हलल्याची स्पष्ट जाणीव झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. काही ठिकाणी घरांच्या भिंती, पत्र्यांची छप्परे आणि घरातील वस्तूही हलल्याचे नागरिकांनी अनुभवले. विशेष म्हणजे, आठवडाभरापूर्वीही ननाशी परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर पुन्हा झालेल्या या भूकंपामुळे पश्चिम पट्ट्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. संबंधित यंत्रणेकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Earthquake tremors felt again in the Dindori western belt.
- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…
- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…
- जगन घाणेकर यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…
तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…
नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…
समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…