नाशिक

रीलसाठी तरुणीचा हवेत गोळीबार

तरुणी ताब्यात, गुन्हा दाखल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरात रील बनवण्याच्या नादात हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिस्तुलाच्या धाकावर लुटमारी करणारा संशयित भूषण गोसावी याच्या सांगण्यावरून त्याची 19 वर्षीय मैत्रीण कोमल रामदास गायकवाड हिने गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करत त्याचा व्हिडिओ (रील) तयार केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले असून, दोघांविरुद्ध शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात अफरोज खान यांना पिस्तुलाचा धाक दाखवून 17 हजार रुपयांची लूट करणारा तसेच देवळाली गावात बांधकाम व्यावसायिक प्रशांत जाधव यांच्या मर्सिडीज कारवर गोळीबार व
दगडफेक करणारा संशयित भूषण गोसावी याचा पोलीस शोध घेत होते. तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली की, गोसावीची मैत्रीण कोमल रामदास गायकवाड (वय 19, रा. संभाजीनगर, एकलहरा ट्रॅक्शन रोड, नाशिकरोड) हिने बेकायदेशीर गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करून त्याचा व्हिडिओ मोबाइलमध्ये जतन करून ठेवला आहे.
या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने एकलहरा ट्रॅक्शन रोड परिसरात छापा टाकून कोमल गायकवाड हिला ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, महिला पोलिसांच्या उपस्थितीत तिचा मोबाइल तपासला असता गॅलरीतील व्हिडिओ फोल्डरमध्ये हवेत गोळीबार करतानाची चित्रफीत आढळून आली. चौकशीत कोमलने 14 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजता नाशिकरोड येथील वैभव हॉटेलमागील वडाच्या झाडाजवळ भूषण गोसावी याने तिला जिवंत काडतूस भरलेला गावठी कट्टा दिला आणि मौजमजेसाठी हवेत गोळीबार करण्यास सांगितल्याची कबुली दिली. गोळीबार करतानाचा व्हिडिओ भूषणने तिच्याच मोबाइलमध्ये चित्रित केला. त्यानंतर तो पिस्तूल घेऊन तेथून निघून गेला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेंद्र जाधव यांच्या फिर्यादीवरून कोमल गायकवाड आणि भूषण गोसावी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 20 हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि संबंधित व्हिडिओ क्लिप असलेला पेनड्राइव्ह जप्त केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील करत आहेत. रीलच्या मोहापायी बेकायदेशीर शस्त्राचा वापर करून जीव धोक्यात घालणार्‍या या प्रकारामुळे तरुणांमध्ये वाढत चाललेल्या बेफिकीर प्रवृत्तीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

Young woman fires gun in the air for a reel.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोगरा फुलला

- प्रणाली देशमुख ए ऐक ना! बघ मी काय आणलंय, पळसाच्या पानाला बांधलेला धागा उकलत…

9 hours ago

समावेशित शिक्षणातून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा

- विजया अवचार प्रत्येक मुलाच्या डोळ्यांत एक स्वप्न असते-शिकण्याचे, घडण्याचे आणि आयुष्यात स्वावलंबी होण्याचे. काही…

9 hours ago

रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

- जगन घाणेकर  यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले…

9 hours ago

बंडाळी चव्हाट्यावर!

तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन…

9 hours ago

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेकडून कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्का कपात

नीलेश देशमुख : ऑगस्ट 2026 पासून निर्णय लागू; चार हजार कर्जदारांना लाभ नाशिक : प्रतिनिधी…

10 hours ago

वैद्यकीय सुविधेचा स्थायी सदस्यांकडून पंचनामा

समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठक : सभापती सानप नाशिक : प्रतिनिधी शहरातील महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह डॉ.…

10 hours ago