तंबाखू, खैनी, गुटखा, खर्रा खाणे घातकच

तंबाखू निषेध दिन

रमेश लांजेवार
नागपूर

संपूर्ण जगातील लोकांना तंबाखूपासून मुक्ती मिळावी,आरोग्य सुदृढ रहावे या उद्देशाने तंबाखू व धुम्रपान यापासून होणारा त्रास दूर करण्याकरीता तंबाखू निषेध दिवस साजरा केल्या जातो.जागतिक आरोग्य संघटना डब्लुएचओच्या सदस्य देशांनी तंबाखू सेवनाने होणार्‍या बिमारीचा मृत्यू दरात वाढ झाल्यामुळे 198% ला महामारी घोषीत करण्यात आली व तंबाखू निषेध दिवस साजरा करण्याचा सल्ला देण्यात आला.8 एप्रिल 1988 ला डब्लूएचओने वर्षगाठ साजरी केली याच दिवशी 31 मे तंबाखू निषेध दिवस साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून 31 मे जागतिक तंबाखू निषेध दिवस साजरा केल्या जातो.

डब्लुएचओने तंबाखू सेवनाने होणार्‍या 25 प्रकारच्या शारीरिक बिमार्‍या पहाता व 40 प्रकारचे कैंसर पहाता आणि या बिमारीचा वाढता मृत्यू दर पहाता याला महामारी घोषीत केली.डब्लुएचओच्या माहितीनुसार जगात तंबाखूने किंवा धुम्रपान केल्याने दरवर्षी %5 लाखांपेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागतात.यावर जगातील देशांनी नियंत्रण ठेवले नाही तर मृत्यूचा आकडा दुप्पटीने वाढू शकतो.कोणत्याही नशेली पदार्थाचे अती सेवन करणे म्हणजे मृत्यूला कवटाळले होय.मानवाची जगण्याची दशा,दीशा ठरवीने हे मानवाच्या मनावर व हातामध्ये असते.परंतु आपल्या मनावरचा ताबा सोडून नशेली पदार्थाचे सेवन केले तर स्वत:ला व परीवाराला घातक सीध्द होवु शकते याला नाकारता येत नाही.तंबाखूच्या सेवनाने कॅन्सर सारखे महाभयानक आजाराने मानुस जखडतो आणि यांचा दुषपरीणाम संपूर्ण परीवाराला भोगावा लागतो.ह्याबाबी मानवाने स्वत: समजून घ्यायला हव्यात.कोणत्याही नशेच्या बाबतीत सरकारचे दुटप्पी धोरण आपल्याला पहायला मिळते.सरकार नशेली वस्तुंची खुलेआम विक्री करण्यास प्राधान्य देते व मोठ्या प्रमाणात परवाने सुध्दा देते आणि दुसरीकडे नशा न करण्याचे आव्हान करते याला कोणते धोरण म्हणावे? मध्यंतरी महाराष्ट्रात दारू-वाईन किराणा दुकान विक्रीला ठेवता येईल या चर्चेला मोठे उधाण आले होते.या चर्चेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला.त्यामुळे ताबडतोबच या चर्चेवर पुर्णविराम लागला.

सरकारने नशाबंदीचे मोठ-मोठे सरकारी ऑफिसेस खोललेली आहेत.याकरीता देशभरात लाखो कर्मचारी कार्यरत असतात.याव्यतीरीक्त अनेक रजिस्टर्ड सामाजिक संस्था व्यसनमुक्तीसाठी कार्य करतांना दीसतात.परंतु सरकार स्वत:हुन नशेली पदार्थाचे उत्पादन बंद करायला तयार नाही.कारण नशेली(मद्द, तंबाखू,खैनी, सिगारेट,बिडी, गुटखा, गांजा इत्यादी)वस्तुपासुन राज्य व केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल (रेव्हेन्यू) मिळत असतो.यावरून स्पष्ट होते की सरकार पैसा कमविण्याकरीता दुटप्पी धोरण अवलंबुन मानवाचा जीव धोक्यात टाकत आहे.कोव्हीड-19च्या महामारीच्या काळात संपूर्ण भारतासह अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन होता याकाळात दारूची दुकाने खोलण्याची मागणी सर्व प्रथम राजकीय पुढार्‍यांची होती आणि अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनच्या काळात दारूची दुकाने खोलण्यात आली.यामुळे सरकारच्या तिजोरीत करोडो रुपयांचा महसूल रूपात पैसा जमा झाला.यावरून स्पष्ट होते की पैशासाठी सरकार व्यसनाधीन करीत आहे.लॉकडाउनच्या काळात दारू, सिगारेट, बीडी,तंबाखू, खैनी, गुटखा,खर्रा,गांजा याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता ह्या वस्तु अवैधरीत्या दुप्पटीने किंवा तिपटीने लोकांनी घेतल्या परंतु नशासोडण्याला कोणीही महत्त्व दिले नाही.

लॉकडाउनच्या काळात लोकांना नशा सोडण्याची सुवर्णसंधी होती.परंतु नशेली वस्तुंची दुकाने खुलताक्षणी सोशल डिस्टिंक्शनची धज्जीया उडवून नशेली वस्तु घेण्याकरिता 3 कीलो मिटर पर्यंत लोक रांगेत उभे होते.अशाने कोणत्याही नशेवर आळा बसणार नाही.प्रत्येकानी जर आपल्या मनावर ताबा ठेवला तर कोणीही नशेच्या आहारी जावु शकत नाही.कोणतीही नशा असो ती घातकच असते. परंतु अती नशा मृत्यूच्या खाईत नेल्याशीवाय रहाणार नाही.याला म्हणतातअती तिथे माती. त्यामुळे कोणतीही नशा करतांना सावधगिरी बाळगली पाहिजे.अन्यथा जिवीत हानी अटळ आहे.तंबाखू, गुटखा,खैनी,खर्रा, सुपारी, दारू यापासून शरीराच्या कोणत्याही अवयवांच्या विकासासाठी चालना देत नाही मग या वस्तूचे सेवन का करावे? कोणतीही नशा असो ती शरीराचा विकास तर करीत नाहीच हालाकी शरिराला छल्ली करण्याचे काम करीत असते व स्लोपॉयझनचे काम करून मृत्युला जवळ करीत असते.आपण साधारणतः नशेली वस्तू व पोषक वस्तू यांचा विचार केला तर मनुष्यासाठी नशेली वस्तूंच्या तुलनेत पोषक वस्तू खुपचं स्वस्त असतात.

उदाहरण द्यायचे झाले तर बादाम 900 रूपये किलो यांच्या तुलनेत गुटखा 4300 रूपये किलो, शुद्ध तुप 600 रूपये किलो यांच्या तुलनेत तंबाखू1000 रूपये किलो, सफरचंद100 रूपये किलो यांच्या तुलनेत सुपारी600 रूपये किलो,दुध 50 रूपये लिटर यांच्या तुलनेत दारू 560 रूपये लिटर अशा प्रकारे अशा अनेक पोष्टीक वस्तू आहेत की त्यांची किंमत नषेली वस्तू पेक्षा कितीतरी पटीने स्वस्त व कमी आहेत.परंतु नशा करणारे बहाद्दर नशेला जास्त महत्त्व देतात हे त्यांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.कोव्हीड-19च्या महामारी पासून सरकारने रस्त्यावर थुंकण्यावर बंदी घातली होती त्याचप्रमाणे सरकारने तंबाखू,गुटखा,खैनी, खर्रा,गांजा यावर सुध्दा बंदी घालायला पाहिजे होती.यामुळे मृत्यू दर कमी होण्यास मोठी मदत होईल.करोना काळात कोरोना महामारीचा प्रकोप दीवसेंदीवस वाढत असतानाच केंद्रशासित प्रदेशासह 28 राज्यांनी तंबाखू व धुम्रपानामुळे कोरोणाची लागन होण्याची शक्यता पहाता.त्यातच फुफ्फुसाचा कर्करोग होतो किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होते असे आरोग्य तज्ञांचे म्हटले होते.या पार्श्वभूमीवर तंबाखू, गुटखा, खैनी, खर्रा सेवन आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालने उचीत होते तीच पद्धत नेहमीसाठी सरकार कडून अमलात यायला हवी

.सध्याच्या परीस्थितीत युवापिढी धुम्रपानाच्याआहारी जातांना दिसत आहे.त्यांनी मनावर ताबा ठेवुन धुम्रपानाचा विरोध करावा व युवकांनीच जगाला संदेश देवुन धुम्रपानाचा निषेध केला पाहिजे. कोणत्याही नशेली वस्तुंसाठी रांगेत उभे रहाने म्हणजे मृत्यूच्या रांगेतउभे रहाल्यासारखे आहे.याची जानीव आजच्या युवा पिढीने लक्षात ठेवली पाहिजे.सरकारने कीतीही नशेली वस्तु विकण्याचा प्रयत्न केला तरीही आपण जर आपल्या मनावर ताबा ठेवला तर कोणतीही नशेली वस्तु तुम्हाला स्पर्शसुध्द करू शकत नाही हेसुद्धा तेवढेच सत्य आहे.कोव्हीड-19 चा उद्रेक पहाता तंबाखू,खर्रा खावुन रस्त्यावर थुंकणे अत्यंत घातक आहे असे तज्ञांचे म्हणणे होते.

त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कोणीही रस्त्यावर तंबाखू,खर्रा किंवा इतर नशेली वस्तू थुंकु नये याची काळजी घ्यायला हवी.कारण रस्त्यावर थुंकल्याने अनेक बिमार्‍यां व संक्रमनात मोठ्या प्रमाणात वाढ होवून आरोग्य धोक्यात येऊ शकते.त्यामुळे कोणत्याही नशेपासुन सावधगिरी बाळगली पाहिजे.तंबाखु किंवा इतर कोणतीही नशेली वस्तु कोरोणा महामारीपेक्षाही घातक आहे ही बाब लक्षात ठेवुन पुढील वाटचाल चांगल्या दिशेने असायला पाहिजे.आपण सुदृढ रहालो तर आपली पिढी सुदृढ राहील त्याचप्रमाणे आपण सुरक्षीतरीत्या जगलो तर तर देश सुरक्षित राहील, देश सुरक्षित रहाला तर जग अवश्य सुरक्षित होईल.त्यामुळे तंबाखू खर्रा खावुन रस्त्यावर थुंकू नका व कोणत्याही महामारीला जाहीर आमंत्रण देऊ नका याकरीता तंबाखू निषेध दिनाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया की यानंतर धुम्रपान व इतर नशेली वस्तूला टाटा-बाय-बाय करू या.

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *