मुसळगाव बायपासवरील अपघात सीसीटीव्हीत कैद
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर-शिर्डी महामार्गावरील मुसळगाव बायपास उड्डाणपुलावर रविवारी (दि. 26) दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आयशर टेम्पो सुमारे 25 फूट उंचीवरून खाली कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो प्रथम पुलाच्या कठड्याला धडकला आणि त्यानंतर थेट खाली उलटला.
अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, वाहनाची पुढील बाजू पूर्णपणे चिरडली गेली. सुदैवाने अपघाताच्या वेळी पुलाखाली कोणतेही वाहन नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मृत चालकाचे नाव रावजीभाई मंजीभाई भंडेनिया (56, रा. राजकोट, गुजरात) असे आहे. ते जीजे-03 डीवाय-0328 क्रमांकाचा आयशर टेम्पो घेऊन नाशिकहून शिर्डीकडे जात होते. मुसळगाव बायपास उड्डाणपुलाजवळ वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. अपघातात वाहनाचेही मोठे नुकसान झाले. या प्रकरणी राजेश वसंत तांबे (रा. पंचवटी, नाशिक) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नवनाथ चकोर
करीत आहेत.
अपघातापूर्वी श्वानांची धावपळ; व्हिडिओ व्हायरल
घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेर्यात अपघाताची संपूर्ण घटना कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये अपघात होण्यापूर्वी पुलाखाली असलेली काही कुत्री अचानक भुंकत पुलाच्या दिशेने धावताना दिसतात. काही क्षणांतच आयशर टेम्पो कठड्याला धडकून उड्डाणपुलावरून खाली कोसळतो. अपघातानंतर तीच कुत्री घाबरून मागे फिरताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, श्वानांना अपघाताची पूर्वचाहूल लागल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
Eicher truck plunges from 25-foot-high flyover; driver dies on the spot.
- अॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…
- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…
- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…
आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…
परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…
फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…