मालेगावचा पाणीपुरवठा बंद; दोषींवर कारवाईचा आयुक्तांचा इशारा
मालेगाव : प्रतिनिधी
शहरातील मुख्य पाणीपुरवठा जलवाहिनीला वारंवार गळती लागण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत मालेगाव महानगरपालिकेने गळतीग्रस्त जलवाहिनी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 29 ते 31 जुलैदरम्यान तीन दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, गळतीचे नेमके कारण तांत्रिक तपासणीनंतर स्पष्ट होणार असून, या प्रकरणात दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त रवींद्र जाधव
यांनी दिला.
आयुक्त जाधव यांनी गळतीग्रस्त ठिकाणी पाहणी केल्यानंतर सांगितले की, तज्ज्ञ अभियंते घटनास्थळी तपासणी करून अहवाल सादर करतील. पाइपची गुणवत्ता निकृष्ट होती, कंपनामुळे (व्हायब्रेशन) गळती झाली की अन्य कोणते तांत्रिक कारण आहे, याचा उलगडा अहवालानंतरच होईल. मात्र, सध्याच्या परिस्थितीत गळतीग्रस्त जलवाहिनी बदलणे हाच कायमस्वरूपी उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, 71 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रातून शहरात पाणी आणणारी 1200 मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी 25 जुलैच्या मध्यरात्री जुन्या आग्रा रोडवरील एकता टूल्ससमोर मोठ्या प्रमाणात फुटली. त्यामुळे दुरुस्तीचे काम करण्यासाठी 29, 30 आणि 31 जुलै असे सलग तीन दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.
यामुळे 29 जुलैचा नियोजित पाणीपुरवठा 1 ऑगस्ट, 30 जुलैचा पुरवठा 2 ऑगस्ट आणि 31 जुलैचा पुरवठा 3 ऑगस्ट रोजी केला जाणार आहे. त्यानंतर पूर्ववत दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.
आयुक्त जाधव यांनी सांगितले की, केवळ गळती बुजविण्याऐवजी संबंधित ठिकाणी दोन ते तीन नवीन पाइप बसविण्यात येणार आहेत. पुढील दोन महिन्यांत संपूर्ण गळतीग्रस्त जलवाहिनी टप्प्याटप्प्याने बदलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी एजन्सीची नियुक्ती, साहित्याची उपलब्धता आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहेत.
कारणांचा सखोल तपास
तळवाडे जलवाहिनीचे कामही 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर तळवाडे धरणातून अधिक प्रमाणात पाण्याचा उपसा शक्य होणार आहे. वारंवार गळती होण्यामागील कारणांचा सखोल तपास केला जाणार असून, यात कोणाचाही निष्काळजीपणा अथवा दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त जाधव यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी पाणी जपून वापरावे
तीन दिवसांचा शटडाऊन आणि बदललेल्या पाणीपुरवठा वेळापत्रकामुळे अनेक भागांमध्ये मागील पाणीपुरवठ्यानंतर तब्बल पाच दिवसांनी पाणी मिळणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि बदललेल्या नियोजनास सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
Frequently bursting water pipeline finally set to be replaced.
- अॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…
- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…
- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…
आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…
परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…
फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…