नाशिक

उड्डाणपुलाखाली कंटेनरच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

चिमुकलीच्या मृत्यूनंतर 24 तासांत दुसरा अपघाताचा बळी; नागरिकांचे ठिय्या आंदोलन

मालेगाव : प्रतिनिधी
कुसुंबामार्गे मालेगावकडे येणार्‍या कंटेनरने नवीन बस स्थानकासमोरील उड्डाणपुलाखाली रस्ता ओलांडणार्‍या ऐंशीवर्षीय वृद्ध महिलेला धडक दिल्याने त्यांचा कंटेनरच्या पुढील चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. निर्मला शांताराम जाधव (वय 80, रा. टिंगरी, ता. मालेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. रविवारी (दि. 30) हा अपघात घडला.
निर्मला जाधव या टिंगरी येथून बसने मालेगावात आल्या होत्या. येथून त्या मुंगसे येथील मुलीकडे जात असताना उड्डाणपुलाखाली रस्ता ओलांडत होत्या. याचवेळी कुसुंब्याच्या दिशेने येणार्‍या कंटेनरने (केए 56 ए 0805) त्यांना धडक दिली. धडकेनंतर त्या कंटेनरच्या पुढील चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. शनिवारी कुसुंबा मार्गावर लेंडाणे येथे भरधाव कारच्या धडकेत 11 वर्षीय आरोही चव्हाण या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अवघ्या 24 तासांत याच मार्गावर आणखी एका महिलेचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी घटनास्थळी ठिय्या आंदोलन करत अवजड वाहतूक तातडीने बंद करण्याची मागणी केली. यावेळी लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबतही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, निर्मला जाधव यांचा मृतदेह विच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा टिंगरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता अपर पोलिस अधीक्षकांनी डोंगराळे तसेच शहरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक तात्पुरती वळविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन स्थगित केले. मात्र, पुढील दोन-तीन दिवसांत अवजड वाहतुकीबाबत कायमस्वरूपी निर्णय न झाल्यास मालेगाव-कुसुंबा मार्गावर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शफिक अँटीकरप्शन यांनी दिला.
अवजड वाहतुकीमुळे मालेगाव-कुसुंबा मार्ग अपघातांचे केंद्र बनला आहे. निष्पाप नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी अवजड वाहतूक कायमची हटवून पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. केवळ आश्वासन न देता प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Elderly woman dies after being hit by a container truck under the flyover.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

3 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago