नाशिक प्रेस फोटोग्राफर असोसिएशनच्या ‘सिंहस्थ संस्कृती’ प्रदर्शनाचा उत्स्फूर्त प्रतिसादात समारोप
नाशिक : प्रतिनिधी
सन 1932 पासूनच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आठवणी जपणार्या दुर्मिळ, अप्रकाशित आणि ऐतिहासिक छायाचित्रांतून नाशिकच्या सिंहस्थ परंपरेचा समृद्ध इतिहास उलगडला. रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स आणि नाशिक प्रेस फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सिंहस्थ संस्कृती’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी उत्स्फूर्त प्रतिसादात समारोप झाला. डॉ. सुनंदा म. गोसावी आर्ट गॅलरी, गुरुदक्षिणा हॉल येथे भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनातून नाशिकचा सांस्कृतिक, सामाजिक आणि नागरी प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून अनुभवता आला.
पत्रकार व प्रेस फोटोग्राफर्सनी जतन केलेल्या या छायाचित्रांमध्ये जुन्या नाशिकचे रूप, गोदावरीचे घाट, साधू-संतांचे आखाडे, शाहीस्नान, भाविकांची गर्दी, धार्मिक विधी तसेच तत्कालीन सामाजिक जीवनाचे दर्शन घडले.
काळानुसार सिंहस्थाच्या आयोजनात झालेले बदल, जुन्या काळातील सुविधा, पारंपरिक आखाडे, वाढती भाविकसंख्या, बदललेले घाट आणि रस्ते यांचे चित्रण प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले.
या प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त कलाकार रणदिवे, सचिव शरद घोरपडे, पोलीस उपायुक्त किशोर काळे, योगेश कमोद, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिकचे कार्यवाह सुहास वैद्य यांनी प्रदर्शनाला भेट दिली. कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते सहभागी छायाचित्रकारांचा रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्सच्या वतीने शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. प्रदर्शनातील छायाचित्रांचे कलेक्शन अत्यंत उपयुक्त असून, आगामी सिंहस्थाच्या नियोजनासाठी त्याचा मोठा उपयोग होईल, असे गौरवोद्गार डॉ. गेडाम यांनी काढले. इतिहास अभ्यासक, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, अभियंते, सनदी लेखापाल, शीख संप्रदायाचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि तरुणांनी प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद दिला. जुन्या छायाचित्रांमुळे ज्येष्ठ नागरिकांना नाशिक व पूर्वीच्या सिंहस्थाच्या आठवणींना उजाळा मिळाला. नव्या पिढीला सिंहस्थाच्या परंपरेचा इतिहास प्रत्यक्ष छायाचित्रांतून समजून घेण्याची संधी मिळाली. ‘सिंहस्थ संस्कृती’ हे प्रदर्शन केवळ जुन्या आठवणींचे संकलन न राहता नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि नागरी परिवर्तनाचे दस्तऐवजीकरण ठरले. छायाचित्रांमधून सिंहस्थाच्या बदलत्या स्वरूपासोबतच नाशिक शहराच्या बदलत्या रूपाचेही दर्शन घडले. नाशिकच्या सिंहस्थाची समृद्ध परंपरा आणि ऐतिहासिक वारसा दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. नाशिककरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि व्यक्त केलेले कौतुक पाहता या उपक्रमाचे सार्थक झाले आहे. भविष्यातही सांस्कृतिक वारसा जपणारे उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळाली आहे, असे मुख्य समन्वयक धनंजय बेळे यांनी सांगितले. प्रदर्शनाच्या सांगता समारंभाप्रसंगी रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्सचे अध्यक्ष अभय नेरकर, सचिव हर्षद बेळे, प्रकल्प संचालक अजय चव्हाण, माजी अध्यक्ष कैलास सोनवणे, ज्येष्ठ रोटेरियन जयंत गोसावी, खजिनदार धीरेंद्र वाघ, विराज गडकरी, पार्थ ठोंबरे, ओम महाजन, मयुरेश शिंदे, हिमांशू पाटील, अथर्व घायाळ आदी उपस्थित होते.
The history of Nashik’s Simhastha tradition unfolds through rare photographs.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…