विद्युत उपकेंद्रालगतच सुरू होता चोरीचा ‘खेळ’
सिडको : प्रतिनिधी
इंदिरानगर- वडाळागाव परिसरातील विद्युत उपकेंद्रालगत असलेल्या घरकुल योजनेत सर्रास वीजचोरी सुरू आहे. गेल्या तीन वषार्ंत अंदाजे तब्बल 40 लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्युत विभागाने वारंवार कनेक्शन तोडूनही अनधिकृत जोडण्या कायम असल्याने महावितरणच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घरकुल योजनेतील एकूण नऊ इमारतींमध्ये 720 ग्राहक आहेत. त्यांपैकी 390 रहिवाशांकडून अनधिकृत वीजजोडण्या घेऊन वीजवापर सुरू असल्याचा आरोप होत आहे. तसेच नऊ थ्रीफेज मीटरपैकी फक्त चार थ्रीफेज जोडण्या अधिकृत आहेत. उर्वरित वीजचोरी ही सलग तीन वर्षांपासून सुरू आहे. यापूर्वीही अनेक वेळा महावितरणकडून अनधिकृत वीजकनेक्शन तोडण्यात आले होते. मात्र, कारवाईनंतर काही दिवसांतच पुन्हा अनधिकृत जोडण्या करून वीजवापर सुरू केला जातो. त्यामुळे केवळ कनेक्शन तोडण्याची औपचारिकता न करता संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या परिसरातील काही ग्राहकांकडे सुमारे तीन वर्षांपासून वीजबिलाची मोठी थकबाकी असल्याचे सांगण्यात येत आहेत. थकबाकी असतानाही अनधिकृत पद्धतीने वीजवापर सुरू आहे. विशेष म्हणजे, विद्युत उपकेंद्राला लागूनच हा सर्व प्रकार सुरू असल्याने महावितरणच्या अधिकार्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
वीजचोरीमुळे नियमितपणे वीजबिल भरणार्या प्रामाणिक ग्राहकांवर आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे महावितरणने या संपूर्ण परिसराची तातडीने तपासणी करून अनधिकृत जोडण्या कायमस्वरूपी बंद कराव्यात, थकबाकी वसूल करावी आणि वीजचोरी आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी वडाळागाव परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता महावितरण प्रशासन याप्रकरणी नेमकी काय ठोस कारवाई करणार याकडे संपूर्ण वडाळागाव परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Electricity theft worth ₹40 lakh over three years
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…