आता 19 ऑक्टोबरला अंतिम मतदारयादी

नवी दिल्ली :
भारत निवडणूक आयोगाने दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार, दिल्लीची अंतिम मतदारयादी आता 19 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यापूर्वी ही यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार होती.
दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी 14 जुलै रोजी अतिरिक्त वेळ देण्याची विनंती केल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. त्यानुसार, संपूर्ण एसआयआर प्रक्रियेच्या विविध टप्प्यांच्या तारखांमध्येही बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून घराघरात जाऊन करण्यात येणार्‍या मतदार पडताळणीची मुदत आता आठ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही प्रक्रिया 29 जुलैपर्यंत पूर्ण होणार होती. त्यामुळे प्रत्यक्ष पडताळणीसाठी सुमारे दहा दिवसांचा अतिरिक्त कालावधी उपलब्ध झाला आहे.
मसुदा मतदारयादी प्रसिद्ध करण्याची तारीखही बदलण्यात आली असून, ती आता 17 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे. यापूर्वी हा मसुदा 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार होता. मसुदा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना दावे आणि हरकती नोंदविण्यासाठी 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत मतदार आपल्या नावातील किंवा तपशीलातील त्रुटींविषयी दावे अथवा हरकती सादर करू शकतील.
नवीन अधिसूचनेनुसार, अंतिम मतदार यादी 19 ऑक्टोबर रोजी प्रकाशित केली जाणार असून संपूर्ण एसआयआर प्रक्रिया सुमारे 12 दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील पडताळणीचे काम पूर्ववत सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे, दिल्लीमध्ये 30 जूनपासून बूथ लेव्हल अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांच्या तपशीलांची प्रत्यक्ष पडताळणी करीत आहेत. अतिरिक्त मुदतीमुळे निवडणूक यंत्रणेला हे काम अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

Extension of SIR deadline in states

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

19 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

19 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

19 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

19 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

20 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

20 hours ago