राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

तिसरे अपत्य झाल्यास निवडणूक अपात्रता धोरणावर प्रश्नचिन्ह

सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी

नवी दिल्ली :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तिसरे अपत्य झालेल्या व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास अपात्र ठरवणार्‍या ‘दोन अपत्य’ धोरणाला
सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा वैध ठरवले आहे. या प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने, देश बदलला आहे. लोकसंख्या नियंत्रण ही काळाची गरज आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.
पंचायत आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी दोन-मुलांच्या नियमाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी तयार करण्यात आलेले हे धोरण, भारताचा घटता प्रजनन दर पाहता कदाचित आपला उद्देश साध्य करू शकले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. तिसरे अपत्य झाल्यामुळे महाराष्ट्रातील एका सरपंचाच्या अपात्रतेला आव्हान देणार्‍या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि आलोक आराधे यांच्या खंडपीठाने, राज्य कायद्यांमध्ये असे नियम कायम ठेवण्यामागील तर्क तपासण्यास आपण तयार असल्याचे सांगितले आणि वकील रुक्मिणी बोबडे यांची ‘अ‍ॅमिकस क्युरी’ (न्यायालयाचे मित्र) म्हणून मदत मागितली.
न्यायमूर्ती नरसिंह यांनी 2003 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत म्हटले, किती निरुपयोगी धोरण आहे! जावेद विरुद्ध हरियाणा राज्य या खटल्याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. देश बदलला आहे. या निकालाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार्‍या उमेदवारांसाठी दोन-मुलांच्या नियमाची घटनात्मक वैधता कायम ठेवली होती. न्यायालयाने नमूद केले की, तेव्हापासून भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय रचनेत लक्षणीय बदल झाला आहे. देशाचा एकूण प्रजनन दर आता सुमारे 1.7 आहे, तर केरळ आणि तामिळनाडूसारख्या राज्यांचा प्रजनन दर अनेक स्कँडिनेव्हियन देशांपेक्षाही कमी आहे. अनेक राज्ये आता घटत्या प्रजनन दराशी झुंज देत आहेत खंडपीठाने म्हटले, सध्याच्या परिस्थितीत, लोकसंख्या कमी करण्याचे हे धोरण सुरू ठेवणे पूर्णपणे बेकायदेशीर ठरू शकते. जेव्हा अनेक राज्ये आता घटत्या प्रजनन दराशी झुंज देत आहेत, तेव्हा लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी तयार केलेले धोरण सुरू ठेवण्याच्या उद्देशावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खंडपीठाने हेही नमूद केले की, तीन मुले असणे हे आता अधिकाधिक सामान्य झाले आहे. न्यायमूर्ती नरसिंह म्हणाले, तुमच्या किंवा माझ्या पिढीत, तीन मुले असणे खूप दुर्मिळ आहे. आता फक्त एकच मूल असते. या धोरणाने आपली परिणामकारकता गमावली आहे. ते तात्काळ मागे घेतले पाहिजे. विरोधी पक्षाचे उमेदवार याचा शस्त्र म्हणून वापर करतात. आम्हाला या धोरणाबद्दल चिंता वाटते.

माजी सरपंचांच्या याचिकेवर सुनावणी
महाराष्ट्रातील माजी सरपंच मंगला भीमराव इंगळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवणार्‍या निर्णयाला आव्हान दिले होते. अतिरिक्त आयुक्तांनी त्यांचे अपील फेटाळले आणि मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट 2025 मध्ये हा निर्णय कायम ठेवला.

 

 

 

Questions raised regarding the policy of electoral disqualification for having a third child.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

19 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

19 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

19 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

19 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

19 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

19 hours ago