– अशोक थोरात
देव देव केलेच पाहिजे. देवाचे आशीर्वाद हवेतच, पण या पणमुळे बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. ते प्रमाण माता-भगिनींमध्ये जास्त वाटते. स्वतःच्या शरीराच्या तंदुरुस्तीसाठी पाच मिनिटे वेळ नाही. घरातील कामासाठी वेळ कमी पडतो. सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत कामांचा डोंगर समोर असतो, पण यातील बहुसंख्य माता-भगिनी देवासाठी मात्र दिवसातील दोन-तीन तास वेळ काढतात. हे अति वाटते. जिजाऊ, सावित्रीच्या लेकी म्हणून महिलांचा सन्मान केलाच पाहिजे, पण त्यांचा प्रवास श्रद्धेेनंतर अंधश्रद्धेेकडे जास्तच सुरू झाला आहे. हे त्यांच्यासाठीच घातक आहे.
सकाळी-संध्याकाळ दहा-दहा मिनिटे देवासमोर बसून प्रार्थना केली पाहिजे. ते संस्कार असतात. पण दोन-दोन तास कुटुंबातील सदस्यांना थोडा त्रास देण्याचा प्रकार वाटतो. समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर कडक भाषेत याच माता-भगिनींना सुनावत असतात व त्या खळखळून हसतात. फक्त महाराज काय बोलले, त्यातून काय बोध घ्यावा, हे मात्र विसरतात. आठवड्यातून तीन-चार उपवास करून मी बघा किती त्याग करते देवासाठी, असे अनेकांना मनोमन वाटते, पण या उपवासामुळे शरीराची चाळण होते, हे विसरतात. मी फराळ न करता उपवास करते, हा विनोद करतात. पण दिवसातून आठ-दहा कप गोड चहा पितात. एवढा चहा पिणे म्हणजे मधुमेह तथा डायबेटीजला आमंत्रण दिल्यासारखे आहे. प्रथा आहे. परंपरा पाळावी लागेल. लोक काय म्हणतील हे विसरून पुढे जा. लोक काय मनाविरुद्ध घडले तर देवालापण शिवीगाळ करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. कांद्याचे भाव कोसळल्यावर मोदींना दररोज लाखो शिव्या बसतात. तो विषय अदखलपात्र असतो.
माता-भगिनींना समजावयाची वेळ आली आहे. धर्म पाळा, कुटुंबाची व स्वतःची काळजी घ्या, निरोगी आयुष्य मिळवा, पण अंधश्रद्धेला दूर ठेवा. कारण मोबाइलवर दिवसभर अंधश्रद्धेेला खतपाणी घालणार्या कथा सुरू असतात. त्यांना विसरा. करोडपती बाबा लोक समाजाच्या सरळपणाचा फायदा घेतात व तुमचे खिसे कापतात. देव मनात ठेवा. छान प्रपंच करा. अधूनमधून चांगले कीर्तन, प्रबोधन ऐका. शेवटी प्रपंच जबाबदारी यातच देव आहे.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या चरित्राचे सार्वजनिक वाचन झाले पाहिजे. ते नावाड्याचा मुलगा. गरीब कुटुंबातील ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या खडतर प्रवासाची माहिती घ्या.
संत तुकाराम, गाडगेबाबा यांसारखे थोर महात्मे अंधश्रद्धेला विरोध करीत. बुवाबाजी, कर्मकांड नका करू, हे सांगत होते, पण अलीकडचे कोट्यधीश बाबा बनवाबनवी करतात. अनेक जेलमध्ये आहेत. काही जाऊन आले आहेत, पण भक्त अंधच राहिले.
मोबाइल, तसेच टीव्हीवरील काही चॅनल हे अंधश्रद्धा वाढवायचे काम जास्त करतात. हेच कार्यक्रम माता-भगिनींना जास्त आवडतात व अंधश्रद्धा वाढत जाते.
अलीकडे महिलांचे लैंगिक शोषण करणार्या सिन्नरच्या अशोक खरातचे प्रकरण ताजे आहे. अशा शंभर भोंदूबाबा राज्यभरात जेलमध्ये आहेत. त्यात प्रचंड वेगवेगळे फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. त्याचा अभ्यास करता श्रद्धेतून अंधश्रद्धेकडे ओढा वाढलेला दिसतो. यात सर्वांत जास्त फसवणूक महिलांचीच झालेली आहे. त्यामुळे मला देव माहीत आहे. मला देव प्रसन्न आहे. तुमच्या अडचणी, घरातील समस्या कायमच्या संपवतो. नवरा दुसरीकडे ढुंकून बघणार नाही, तुझ्या मुठीतच राहील, अशा तुम्हाला हव्या त्या थापा मारणारे भोंदू फसवत आहेत. याचा अभ्यास करून सावध झाले पाहिजे. पूर्वी गुरूशिवाय पान हालत नसे, पण आता गुरूपासून दूरच बरे. कारण गुरू हळूच डल्ला मारतो. नको ते करायला भाग पाडतो. ज्यांनी ज्यांनी अशोक खरातसारखे गुरू केले, त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ बघून बाबाच व्हावे असे वाटेल. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनवाले सांगतात त्यावर विश्वास ठेवला पाहिजे.
Faith is fine… but not superstition!
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…