नाशिक

भावली धरणावर पर्यटनास गेलेल्या कुटुंबावर हल्ला

कारच्या काचा फोडत मारहाण, लूटमार; गुन्हा दाखल

नाशिक : प्रतिनिधी
इगतपुरीजवळील भावली धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या नाशिकच्या एका कुटुंबाचा पाठलाग करून सहा ते सात अज्ञात गुंडांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना 12 जुलै रोजी घडली आहे. हल्लेखोरांनी महिलेचा विनयभंग करत मोबाइल आणि सोन्याची साखळी लुटली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या विविध गंभीर कलमांंतर्गत झिरो एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद पुढील तपासासाठी इगतपुरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे.

नाशिकरोड येथील पूनम किरण भागवत (वय 44) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवारी (12 जुलै) पूनम, त्यांचे पती किरण भागवत, मुले, दीर सागर भागवत आणि जाऊ कोमल भागवत हे सर्वजण त्यांच्या टाटा सफारी (एमएच 15- क्यू 1337) कारने इगतपुरीतील भावली धरण येथे पर्यटनासाठी गेले होते. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास धरणाजवळील धबधब्याकडे पाहत असताना 20 ते 25 वयोगटातील दोन अज्ञात तरुणांनी पूनम यांच्याकडे बघून शिट्या वाजवल्या. त्यांच्या पतीने विरोध केला असता तिथे उपस्थित असलेल्या सात-आठ स्थानिक तरुणांनी त्यांच्या पतीशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली.
या घटनेचे गांभीर्य ओळखून हे कुटुंब नाशिककडे जाण्यासाठी निघाले. मात्र, सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर एका पांढर्‍या रंगाच्या मारुती बलेनो कारने (एमएच 46- बीई 3721) त्यांच्या कारचा पाठलाग करून गाडी आडवी लावली. बांबू, बेसबॉल स्टिक आणि लोखंडी रॉड घेऊन उतरलेल्या सहा-सात जणांनी टाटा सफारीच्या काचा फोडल्या. यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरूनही (एमएच 15-के4502) काही तरुण आले होते. हल्लेेखोरांनी कारची काच फोडून विनयभंग केला व त्यांच्या हातातील सॅमसंग एस 24 अल्ट्रा मोबाइल हिसकावून घेतला. पती किरण यांना शिवीगाळ करत मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावली.
एका हल्लेखोराने पतीच्या डोक्यात बेसबॉल स्टिकने मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी तो वार चुकवल्याने मोठा अनर्थ टळला. या कुटुंबाने कसेबसे तेथून पळ काढत थेट नाशिकचे अंबड पोलीस ठाणे गाठले. तिथे पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंह राजपूत यांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला. घटनास्थळ इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील कारवाईसाठी इगतपुरी (नाशिक ग्रामीण) पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

Family visiting Bhavli Dam attacked

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

18 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

18 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

18 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

18 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

18 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

18 hours ago