नाशिक

वीजप्रश्नी शेतकर्‍यांनी रोखला सुरत महामार्ग

सावतावाडीजवळ आंदोलन; महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

मालेगाव : प्रतिनिधी
पावसाने ओढ दिल्याने आधीच संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसमोर आता वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठ्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. वडनेर महावितरण कार्यालयांतर्गत येणार्‍या वडनेर, सावतावाडी, खाकुर्डी आणि काटवन परिसरातील संतप्त शेतकर्‍यांनी वीजप्रश्नी सोमवारी (दि. 21 सप्टेंबर) सायंकाळी सावतावाडी येथे सुरत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
काटवन परिसरात यंदा पावसाने साथ न दिल्याने खरीप पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. अशातच महावितरणचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विहिरी आणि कूपनलिकांद्वारे पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. संबंधित सबस्टेशनला सोलर प्लांट जोडला असला, तरी वीजनिर्मिती कमी झाल्यास शेतीसाठी पर्यायी वीजव्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतीसाठी नियमित व सुरळीत वीज उपलब्ध करून द्यावी, सोलर वीजनिर्मिती कमी झाल्यास पर्यायी व्यवस्था करावी आणि वीजपुरवठ्याचे दोन सत्रांत योग्य नियोजन करावे, अशी आक्रमक भूमिका शेतकर्‍यांनी घेतली. या आंदोलनात भाजपचे दिकपाल गिरासे, खाकुर्डीचे माजी सरपंच पवन ठाकरे, मनोज जैन, राजेंद्र चौधरी, शिवराज बच्छाव, सदाशिव चौधरी, माधव बोरसे, उमेश बच्छाव यांच्यासह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.

वाहतूक कोंडी अन् प्रशासकीय आश्वासन

रास्ता रोकोमुळे सुरत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वडनेर-खाकुर्डी पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रित केली. अखेर वरिष्ठ अधिकार्‍यांकडून वीजप्रश्न सोडवण्याबाबत ठोस आश्वासन मिळाल्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले.

सोलर वीजनिर्मिती कमी झाल्यास महावितरणकडे पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे आहे. पावसाने पाठ फिरवली असताना वीज समस्येमुळे तोंडाशी आलेली खरीप पिके वाया जात आहेत. प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून नियमित वीजपुरवठा करावा आणि दोन सत्रांत नियोजन करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. – पवन ठाकरे, माजी सरपंच, खाकुर्डी

Farmers block Surat highway over electricity issue.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

1 day ago

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…

1 day ago

थेट विरोध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा…

1 day ago

ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या 370 कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…

1 day ago

इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही

अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…

1 day ago

स्वीकृतच्या दहा नगरसेवकांची अखेर नियुक्ती

महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…

1 day ago