नाशिक

वेदांत पार्कमध्ये फ्लॅटला भीषण आग

फ्रिजने पेट घेतला; चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आगीचे तांडव

सिन्नर : प्रतिनिधी
द्वारकानगरीतील वेदांत पार्कच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटच्या किचनमध्ये सोमवारी (दि.21) सकाळी साडेसहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे फ्रिजने पेट घेतला. काही क्षणातच आगीने किचनसह फ्लॅटमधील साहित्याला कवेत घेतल्याने धुराचे लोट पसरले. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मानंद कोबारणे यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिल्याने एमआयडीसीचा अग्निशमन बंब प्रथम घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर सिन्नर नगरपालिकेचा बंब पोहोचला. दोन्ही बंबांच्या संयुक्त प्रयत्नांनी सुमारे अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
शैलेश भगवान पाटील (वय 26) व त्यांची पत्नी श्रद्धा हे वेदांत पार्कमधील संबंधित फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी शैलेश पाटील उठल्यानंतर किचनमध्ये गेले असता, फ्रिज पेटलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी तत्काळ पत्नीला जागे केले. तसेच इमारतीतील अन्य रहिवाशांना आगीची माहिती देत सावध केले.
दरम्यान, आगीमुळे फ्रिजमधील वायूचा काही प्रमाणात स्फोट झाल्याने फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. काही वेळातच सिन्नर नगरपालिकेचा अग्निशमन बंबही दाखल झाला. दोन्ही अग्निशमन पथकांनी संयुक्तरीत्या आग विझविण्याचे काम सुरू केले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीचा धोका लक्षात घेऊन इमारतीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. तसेच इमारत रिकामी करून सर्व रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पाटील यांच्या किचनमधील गॅस सिलिंडरही तातडीने बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आग अधिक भडकण्याचा धोका टळला.
सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी लाला वाल्मीकी, कास शिंदे, कार्तीक पवार, सौरभ भागवत, वैभव केदार व अक्षय लोणारे यांनी आग विझविण्याच्या कामात सहभाग घेतला. अग्निशमन दलाच्या दोन्ही बंबांनी वेळीच केलेल्या संयुक्त कारवाईमुळे आग इतर फ्लॅटमध्ये पसरण्यापासून रोखण्यात आली.
या आगीत पाटील यांच्या फ्लॅटमधील फ्रिज, लायटिंगसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.

Massive fire in a flat at Vedanta Park

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

लाल कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण

लासलगाव : वार्ताहर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार (दि. 19) आणि शुक्रवार (दि. 20)…

1 day ago

सगुण-निर्गुण एकचि पांडुरंग!

कार्तिकी एकादशी जिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी…

1 day ago

थेट विरोध

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरूच आहे. शरद पवारांच्या आजारपणात विलीनीकरणाची चर्चा…

1 day ago

ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या 370 कोटींच्या खर्चाला मंजुरी

सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध…

1 day ago

इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र पासची आवश्यकता नाही

अतिरिक्त भाडेही नाही; सिटीलिंकची माहिती नाशिक : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाशिकसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस…

1 day ago

स्वीकृतच्या दहा नगरसेवकांची अखेर नियुक्ती

महासभेत घोषणा; दुसरी जागा ठाकरे गटाने मिळवलीच नाशिक : प्रतिनिधी संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या…

1 day ago